नागपूर : नागपुरात रामनगर चौकातील हनुमान मंदिर हे राजकीय आखाडा बनेल का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच मंदिरात खासदार नवनीत राणा आणि पती रवी राणा हे हनुमान चालिसा पठण करणार आहे. तेच दुसरीकडे राष्ट्रवादीकडून मंदिरात हनुनाम चालिसा पठण करण्याचे ( Recitation of Hanuman Chalisa by NCP )आयोजन याच मंदिरात करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे हनुमान चालिसा पठणावरून राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादीचे पदाधिकरी यांची जुंपणार आहे.
यातच राष्ट्रवादीकडून आमच्या देशावर बेरोजगारी महागाईचे आलेले संकट दूर व्हावे यासाठी संकट मोचन हनुमान आरती पठण करणार आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी सांगितले. यासोबतच राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी खासदार नवनीत राणा यांना आव्हानही दिले आहे. खरंच हनुमानजीचे भक्त असाल, तर पुस्तकात पाहून न म्हणता, मुखोद्गत किंवा पाठांतर हनुमान चालिसा असेल, तर त्यांनी ती म्हणून दाखवावी. अन्यथा त्यांनी हे जे काही पठणाचा ड्रामा सुरू केला आहे, तो बंद करावा असेही ते म्हणाले. त्यामुळे या क्तव्यावरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेच आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालिसा पठण करायचे असेल, तर अमरावतीत जाऊन करावे नागपुरात राजकीय इव्हेंट करायची गरज नाही, असाही टोला राष्ट्रवादीकडून लावण्यात आला आहे.
राष्ट्रवादीकडून रितसर पोलिसांना परवानगी मागण्यात आली आहे. ते परवानगी देतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी बोलून दाखवले. त्यामुळे उद्या नेमके कोणाला परवानगी मिळणार आणि या परिस्थितीला कसे हाताळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Navneet Rana receives death threats : खासदार नवनीत राणा यांना जिवे मारण्याच्या धमक्या