नागपूर - पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( PFI ) विरोधात एनआयए,( NIA ) एटीएस, केंद्र तसेच राज्य सरकडे मोठ्या प्रमाणा पुरावे उपलब्ध आहेत. यापूर्वी केरळ सरकारने पीएफआयवर बंदीची मागणी ( Kerala government demanded ban PFI ) केली होती, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( State Home Minister Devendra Fadnavis ) यांनी दिली आहे.
ते आज नागपूर विमानतळावर पत्रकारांसोबत बोलत होते. तपासातून अनेक पुरावे बाहेर येतील. देशात अस्थिरता निर्माण करण्याचे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया षडयंत्र ( Popular Front of India ) असल्याचे फडणवीस म्हणाले. देशभरातील 11 राज्यांत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( Popular Front of India ) अर्थात पीएफआय या संघटनेच्या कार्यलायांवर एन आयए, एटीएसच्या धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यात काही लोकांना अटक देखील करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ काल पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या संघटनेच्या आंदोलन ( Popular Front of India protested in Pune ) करण्यात आल होते. आंदोलन करणाऱ्या 60 ते 70 जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल (Case registered against PFI Activists in Pune ) केले आहेत.
बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ( case Bundagarden police station ) करण्यात आला आहे. रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय 26, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) याच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी 141 143, 145, 147, 149,188,341 सह मपोका 37/1/3 सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
बेकायदेशीर आंदोलन - या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीर जमा जमा करून आंदोलन केले. तसेच केंद्रीय तपास यंत्रणेने पीएसआयच्या नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आरोपींनी मोठमोठ्याने घोषणा देत रस्ता अडवला. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना वाहनांना अडथळा निर्माण करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. बंड गार्डन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.