ETV Bharat / city

वडेट्टीवारांनी खोडसाळ राजकारण करू नये - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी - politics

देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गडकरी यांनी आपल्याला गुपचूप काही तरी सांगितले, असे जे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले, त्यांच्या भाषणाची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णतः निराधार, खोटे आणि बेजबाबदारपणाचे आहे. फडणवीस माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत. शिवाय, ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे तशा प्रकारचा संभ्रम काँग्रेसचे मंत्री वडेट्टीवार आमच्याही बाबतीत निर्माण करू पाहतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
author img

By

Published : Oct 21, 2021, 5:36 PM IST

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मला खासगीत सांगितले की मी फडणवीसांची चांगलीच जिरवली आहे. पुढेही जिवणार, असे वक्त्यव्य मंत्री विजय वडेट्टीवार केले आहे. याबाबतचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यावर प्रतिक्रिया देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, मी वडेट्टीवार यांनी कधीही, कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही. वडेट्टीवारांनी तशी वक्तव्ये करून बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये, असा टोलाही केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला आहे.

व्हायरल व्हिडिओ

एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा - गडकरी

फडणवीस यांच्या विरोधात गडकरी यांनी आपल्याला गुपचूप काही तरी सांगितले, असे जे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले, त्यांच्या भाषणाची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णतः निराधार, खोटे आणि बेजबाबदारपणाचे आहे. फडणवीस माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत. शिवाय, ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे तशा प्रकारचा संभ्रम काँग्रेसचे मंत्री वडेट्टीवार आमच्याही बाबतीत निर्माण करू पाहतात, असेही गडकरी यांनी म्हणाले.

फडणवीस कर्तृत्ववान नेते - गडकरी

फडणवीस यांच्या कारकिर्दीतील महाराष्ट्राची प्रगती झाली. विरोधी पक्ष नेते म्हणूनही ते उत्तम काम करत आहेत. महाविकास आघाडीच्या चुकांवर नेमके बोट ठेवून ते लोकशाहीतील विरोधकांचे कर्तव्य निभावत आहेत. सरकार तीन पक्षांचे असले तरी काँग्रेसमध्ये नैराश्य आहे. त्यांना कुणीही मोजत नाही. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी वडेट्टीवार यांच्यासारखे काँग्रेसी नेते अशा प्रकारची वक्तव्यं करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप गडकरी यांनी केला आहे.

हेही वाचा - भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहारप्रकरणी एकनाथ खडसेंना दिलासा, आठवडाभर अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.