ETV Bharat / city

जेईई मुख्य परिक्षेतील गैरप्रकारात नागपूर कनेक्शन? शहरातील कोचिंग क्लासेसवर सीबीआयचा छापा

author img

By

Published : Sep 14, 2021, 12:53 PM IST

Updated : Sep 14, 2021, 3:41 PM IST

जेईई मेन्स परिक्षेतील गैरप्रकाराचे नागपूर कनेक्शन तपासण्यासाठी काही कोचिंग क्लासेस मधील दस्ताऐवजाची तपासणी केल्याची माहिती पुढे आली आहे. नागपुरातील आजमशाह चौक आणि नंदनवन परिसरातील दोन कोचिंग क्लासेसवर सीबीआयच्या टीमने काल चौकशी केली.

सीबीआयचा छापा
सीबीआयचा छापा

नागपूर - जॉईंट इन्ट्रन्स एक्झामीनेशन म्हणजे (जेईई) मुख्य परीक्षेत गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून काल (सोमवारी) नागपुरातील काही प्रतिष्ठित कोचिंग क्लासेसच्या कार्यालयांवर सीबीआयच्या पथकाने छापा टाकून चौकशी केली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. सीबीआयच्या पथकाने कोचिंग क्लासेसमध्ये तपासणी केली आहे.

जेईई मेन्स परिक्षेतील गैरप्रकाराचे नागपूर कनेक्शन तपासण्यासाठी काही कोचिंग क्लासेस मधील दस्ताऐवजाची तपासणी केल्याची माहिती पुढे आली आहे. नागपुरातील आजमशाह चौक आणि नंदनवन परिसरातील दोन कोचिंग क्लासेसवर सीबीआयच्या टीमने काल चौकशी केली. गेल्या आठवड्यात दिल्ली, जमशेदपूर, इंदूर, बंगळुरू आणि पुण्यातील काही कोचिंग क्लासेसची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर आता नागपुरात तपास मोहीम राबविल्याची माहिती समोर आली आहे.

माहिती देण्यास नकार -

जेईई मुख्य परीक्षेत परीक्षार्थ्यांना निवडक नावाजलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी आमिष देऊन काही गैरप्रकार केल्याचा संशय या कोचिंग क्लासेसबद्दल आहे. नागपुरातील सीबीआयचे अधिकारी यासंदर्भात जास्त माहिती देण्यास तयार नाहीत. दिल्लीच्या युनिटकडून देशभर ही कारवाई करण्यात येत असल्याचे ते सांगत आहेत.

Last Updated : Sep 14, 2021, 3:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.