ETV Bharat / city

Bharat Mukti Morcha : विनापरवानगी आंदोलनामुळे 'त्या' मोर्चाच्या अध्यक्षांसह अडीच हजार लोकांविरोधात गुन्हा दाखल - भारत मुक्ती मोर्चा विनापरवानगी आंदोलन

नागपूरातील इंदोरा परिसरात काल भारत मुक्ती मोर्चातर्फे विनापरवानगी (Morcha protesting without permission) करण्यात आलेल्या आंदोलन प्रकरणी भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांच्यासह तब्बल अडीच हजार लोकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला (case against president of Bharat Mukti Morcha) आहे.

Bharat Mukti Morcha
भारत मुक्ती मोर्चा विनापरवानगी आंदोलन
author img

By

Published : Oct 7, 2022, 1:17 PM IST

नागपूर : नागपूरातील इंदोरा परिसरात काल भारत मुक्ती मोर्चातर्फे विनापरवानगी (Morcha protesting without permission) करण्यात आलेल्या आंदोलन प्रकरणी भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांच्यासह तब्बल अडीच हजार लोकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला (case against president of Bharat Mukti Morcha) आहे. आयपीसीच्या कलम 341,143, 145,188 आणि 120 (ब) अनुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशाचे भंग करणे, विनापरवानगी आंदोलन करणे, पोलिसांनी दिलेल्या नोटीसचे उल्लंघन करणे आणि सार्वजनिक शांततेचा भंग करणे अशा आरोपाखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सुरुवातीला नागपूर पोलिसांनी मोर्चा आणि आंदोलन करण्याची परवानगी नाकारली होती त्यानंतर न्यायालयाने सुद्धा परवानगी नाकारली तरी देखील भारत मुक्ती मोर्चा संघटनेचे प्रमुख वामन मेश्राम मोर्चा काढण्यावर ठाम होते. त्यांच्या अवाहनानंतर हजारो आंदोलनकर्ते इंदोरा चौक परिसरात एकत्रित झाले होते, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाली (case against Bharat Mukti Morcha protest) होती.

कश्यासाठी होता मोर्चा - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधान विरोधी काम करते, असा आरोप करत भारत मुक्ती मोर्चा संघटनेचे प्रमुख वामन मेश्राम Bharat Mukti Morcha President Vaman Meshram यांच्या नेतृत्वात आज बेझनबाग ते संघ मुख्यालय, असा मोर्चा काढण्यात येणार होता. त्यानंतर आंदोलक संघ मुख्यालयाला घेराव घालणार होते.

का नाकारली परवानगी -शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिनासह इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू असल्याने शहर पोलिसांनी भारत मुक्ती मोर्चा संघटनेला आंदोलनाची परवानगी नाकारली होती. त्याचबरोबर न्यायालयाने देखील वामन मेश्राम यांची याचिका फेटाळून लावत सहा ते नऊ ऑक्टोबर दरम्यान पोलिसांकडे अर्ज करून कार्यक्रम आयोजित करावा, असे निर्देश दिले होते. तरी देखील वामन मेश्राम आणि त्यांची संघटना आंदोलनाच्या भूमिकेवर कायम असल्यामुळे नागपूर शहर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण इंदोरा परिसरात कलम 144 लागू करावी लागली (Bharat Mukti Morcha) होती.

कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात - विनापरवागी आंदोलन करत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते. इंदोरा भागात आंदोलनकर्ते एकत्रित झाले होते. यासंदर्भात पोलिसांना सूचना मिळताच पोलिसांनी हजारो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.