ETV Bharat / city

पालकमंत्र्यांनी नागपुरात लावलेले लॉकडाऊन फसवे - आमदार प्रवीण दटके - BJP MLA Pravin Datke news

कोणालाच विश्वासात न घेता नागपुरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे हे फसवे लॉकडाऊन असल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी केला आहे.

BJP MLA Pravin Datke
भाजपचे आमदार प्रवीण दटके
author img

By

Published : Mar 12, 2021, 7:50 PM IST

नागपूर - नागपुरात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने परिस्थिती पाहता पालकमंत्री नितीन राऊत यांनी 14 मार्चपर्यंत असणाऱ्या अंशतः लॉकडाऊनमध्ये बदल केला आहे. 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान लॉकडाऊन कडक करत संचारबंदीची घोषणा केली. पण, हा निर्णय कोणालाचा विश्वासात न घेताच घेतल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी केला. तसेच फसवे लॉकडाऊन म्हणत याला त्यांनी विरोध दर्शवला आहे.

भाजपचे आमदार प्रवीण दटके

हेही वाचा - बेळगावात शिवसेनेच्या रुग्णवाहिकेवर कन्नडिगांचा हल्ला, घटनास्थळी तणाव

जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत हे काँग्रेसचे असले तरी मनपामध्ये भाजपची सत्ता आहे. यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस असे राजकारण तापताना दिसून येत आहे. याला कडक लॉकडाऊन म्हणत आहे. पण वाहतुक सुरू आहे, पार्सल सुविधा सुरू आहे, कॉटन मार्केट सुरू आहे, मद्य विक्री सुरू आहे, ट्रान्सपोर्ट सुरू असणार आहे. ऑनलाईन जेवण मागावणे सुरू आहे. मग बंद काय आहे? असाही सवाल प्रवीण दटके यांनी केला.

कडक लॉकडाऊनच्या नावाखाली हातावर पोट असणाऱ्याचे धंदे बंद असणार आहेत. त्यांचे नुकसान होत असताना सरकार त्यांच्या घरी जेवण पोहचवणार आहे का? असा सवाल आमदार प्रवीण दटके यांनी केला आहे.

कडक निर्बध लावा लॉकडाऊनच का?

यात मास्क लावणे असो, सामाजिक अंतर असो हे कडक करा. अमरावती शहरात सात दिवस लॉकडाऊन होते त्याचा काय फायदा झाला? यामुळे पालकमंत्री कडक लॉकडाऊन म्हणत असलेल्याला विरोध आहे असे ते म्हणाले. यासह हा निर्णय घेतांना भाजप असो सेना असो की नागपूर ग्रामीणचे खासदार असो की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असो, देवेंद्र फडणवीस असो, शहराचे महापौर कोणालाच विश्वासात न घेता हे लॉकडाऊन लावले आहे. यामुळे जनतेच्या प्रतिनिधींना डावलण्यावर संताप व्यक्त केला.

हेही वाचा - ...तर नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन लावावा लागेल - चव्हाण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.