ETV Bharat / city

Legislative Council Election : नागपुरात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत भाजपचे नगरसेवक मतदान केंद्रात दाखल

नागपूरमध्ये आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Nagpur Legislative Council Election) मतदान सुरु आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होण्याची शक्यता लक्षात घेता भाजपच्या नगरसेवकांना (BJP Corporators In Nagpur) कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान केंद्रावर आणण्यात आले आहे. त्यासाठी ११ नगरसेवकांचे गट पाडण्यात आले आहेत.

निवडणूक
निवडणूक
author img

By

Published : Dec 10, 2021, 3:08 PM IST

नागपूर - नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत होत असलेल्या विधान परिषद निवडणूकीच्या मतदानाची (Nagpur Legislative Council Voting) प्रक्रिया सुरू आहे. संख्या बळ भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे. मात्र घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, भाजपकडून जोरदार खबरदारी घेतली जात आहे. चार बसेसच्या माध्यमातून नगरसेवकांना (BJP Corporators In Nagpur) मतदान केंद्रात आणण्यात आले. यावेळी ११ नगरसेवकांचे गट पाडण्यात आले असून, नगरसेवकांपैकी एकाला नेतृत्व देण्यात आले आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना ५५९ पैकी ४०० मते पडून ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा दावा आमदार कृष्णा खोपडे (MLA Krishna Khopade) आणि आमदार प्रवीण दटके (MLC Pravin Datke) यांनी केला आहे.

विधान परिषदेची ही निवडणूक थेट भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस (BJP Vs Congress) यांच्यात होत असली तरी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांचे महत्त्व काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारापेक्षा जास्त वाढलेले आहे. मतदानाला केवळ १२ तास शिल्लक असताना काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार बदलल्यामुळे काँग्रेस नगरसेवकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. काँग्रेसचा नेमका उमेदवार कोण? याबाबत काँग्रेस नगरसेवकांमध्ये संभ्रम असल्याने, याचा थेट फायदा भाजप होईल असं मत भाजप नेते व्यक्त करत आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होण्याची शक्यता लक्षात घेता भाजपच्या नगरसेवकांना कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान केंद्रावर आणण्यात आले.
काँग्रेसचा गोंधळ आजही कायमनिवडणुकीची घोषणा झाल्यापासून काँग्रेस पक्ष गोंधळलेल्या मनस्थिती मध्ये असल्याचं चित्र आहे. सुरवातीला उमेदवार कोण असेल? हा गोंधळ होता तर, मतदानाच्या आदल्या दिवशी चक्क उमेदवारच बदलावा लागला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी काँग्रेसचे मतदार सुद्धा संभ्रमात आहेत. काही जाणकारांच्या मते, यामागे काँग्रेसची मोठी खेळी सुद्धा असण्याची शक्यता असून, निकालानंतर त्याचा खुलासा होईल, असं वाटतं आहे.सुरवातीपासूनच भाजप सतर्क निवडणूक जाहीर झाल्यापासूनच रोज नवनवीन घटना घडत असल्याने, भाजपचे नेते भलतेच सतर्क असल्याचे दिसून येत होते. तर, काँग्रेसच्या गळाला संघाचा स्वयंसेवक लागल्याने या निवडणुकीची रंगत वाढली होती. निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून भाजपने आपल्या सर्व नगरसेवकांना त्यांच्या कुटुंबियांसह सहलीला पाठवले होते. मतदान होईपर्यंत सर्व नगरसेवकांना एकत्र ठेण्यात भाजपला यश आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.