ETV Bharat / city

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक: महापौर संदीप जोशी भाजपाचे उमेदवार

भारतीय जनता पक्षाकडून नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीसाठी महापौर संदीप जोशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

महापौर संदीप जोशी
Mayor Sandeep Joshi
author img

By

Published : Nov 9, 2020, 3:31 PM IST

नागपूर - नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून महापौर संदीप जोशी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी विरुद्ध संदीप जोशी, असा सामना रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपने विद्यमान आमदार प्राध्यापक अनिल सोले यांना पक्षाने दुसऱ्यांदा संधी नाकारली आहे. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन कसे केले जाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महापौर संदीप जोशी यांना भाजपाची उमेदवारी जाहीर
नागपूर पदवीधर मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सलग तीनवेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे. शिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस आणि पंडित बच्छराज व्यास यांनी देखील मतदार संघातून निवडणूक जिंकली होती. गेल्या ५० वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे. त्यामुळे इथून निवडणूक लढताना स्वतःवर प्रचंड दबाव तर आहेच. त्यापेक्षा जास्त जबाबदारी असल्याचे संदीप जोशी म्हणाले आहेत. सलग २२ वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून मी राजकारणात सक्रिय राहून जनतेची सेवा केली आहे. त्याचप्रमाणे या निवडणुकीच्या माध्यमातून पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहीन असे त्यांनी सांगितले.
उमेदवारी निवडीत फडणवीस गटाचा वर्चस्व -
विद्यमान आमदार प्राध्यापक अनिल सोले हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गटाचे मानले जातात. तर महापौर संदीप जोशी हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. दोन्ही उमेदवारांचे नाव शेवटपर्यंत चर्चेत होते. मात्र शेवटच्या क्षणी उमेदवारी पदाची माळ संदीप जोशी यांच्या गळ्यात पडल्याने फडणवीस गटाच्या उमेदवाराचा निवडीत वरचष्मा राहिल्याचे दिसून आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.