नागपूर - नागपूरच्या धरमपेठ परिसरातील बिशप कॉटन स्कुलमध्ये अज्ञातांनी दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला ( Nagpur School Vandalism ) आहे. शाळेच्या आवारात कुंड्याची तोडफोड करत दारूच्या बॉटल फोडल्याचे सोमवारी शाळा उघडल्यानंतर समोर आले. या घटनास्थळाची पाहणी पोलिसांनी केली आहे. अज्ञातावर गुन्हा दाखल करत चौकशी करणार असल्याची माहिती सीताबर्डी पोलिसांनी दिली आहे.
दारुच्या बॉटल फोडल्या - नागपूरच्या धरमपेठ परिसरात बिशप कॉटन प्रायमरी शाळा असून, रविवारी सुट्टी असल्याने शाळा बंद होती. याच दरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी दारू पिऊन धिंगाणा घातला असल्याचे समोर आले आहे. त्यात शाळेच्या आवारात असलेल्या झाडे लावलेल्या कुंड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. यासोबतच दारू पिऊन रिकाम्या बॉटलांच्या काचा सर्वत्र फेकण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - MNS Political analysts : राज ठाकरेंची राजकीय गोची? सातत्याने भूमिका बदलणे महागात?