नागपूर - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानभवन सचिवांना मंगळवारी ( 28 जून ) बहुमत सिद्ध करण्यासाठी एक पत्र पाठवण्यात आलं ( Governor Koshyari Fake Letter ) होतं. पण, नंतर हे पत्र बनावट असल्याचा खुलासा राज्यपाल कार्यालाकडून सांगण्यात आलं. त्यावर प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'ते पत्र बनावट असले तर राज्यपाल या संस्थेचा असंवैधानिक दुरुपयोग झालेला दिसतो. हे पत्र ज्याने कोणी काढलेलं असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी लोंढे ( Atul Londhe ) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील ( Hm Dilip Walase Patil ) यांच्याकडे केली आहे.
-
राज्यपाल या संस्थेचा असंविधानिक दुरुपयोग झालेला दिसतो हे पत्र ज्याने कोणी काढलेलं असेल त्यांनी तो गुन्हा केलेला आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी सन्माननीय गृहमंत्र्यांना @Dwalsepatil आहे pic.twitter.com/eqlRtNTrdu
— Atul Londhe (@atullondhe) June 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">राज्यपाल या संस्थेचा असंविधानिक दुरुपयोग झालेला दिसतो हे पत्र ज्याने कोणी काढलेलं असेल त्यांनी तो गुन्हा केलेला आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी सन्माननीय गृहमंत्र्यांना @Dwalsepatil आहे pic.twitter.com/eqlRtNTrdu
— Atul Londhe (@atullondhe) June 28, 2022राज्यपाल या संस्थेचा असंविधानिक दुरुपयोग झालेला दिसतो हे पत्र ज्याने कोणी काढलेलं असेल त्यांनी तो गुन्हा केलेला आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी सन्माननीय गृहमंत्र्यांना @Dwalsepatil आहे pic.twitter.com/eqlRtNTrdu
— Atul Londhe (@atullondhe) June 28, 2022
राज्यात सत्ता बदलाचा घटनाक्रम वेगाने घडत आहे. मंगळवारी रात्री राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या मोठ्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन राज्य सरकारला बहुमत सिद्ध कराण्यासाठी आदेश द्यावा, अशी विनंतर केली. त्यानंतर लगेचंच राज्यपाल यांच्या कार्यालयाकडून एक पत्र विधिमंडळ सचिवांच्या नावे पाठवण्यात आलं होतं. त्यात 30 जून रोजी राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्या पत्रावरील तारीख ही 29 जून असल्याने ते पत्र बनावट असल्याचा खुलासा राज्यपालांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
सरकारची उद्या अग्नी परीक्षा - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार संकटात आहे. त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही, असं भाजप कडून सांगण्यात आलं आहे. भाजप शिष्टमंडळांनं देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर बुधवारी राज्यपालांनी उद्या ( 30 जून ) सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.