नागपूर - २०१४ आधी सलग तीन वेळा उत्तर नागपूर मतदारसंघातून विधानसभेत जाणारे माजी मंत्री नितीन राऊत यांना काँग्रेसने पुन्हा मैदानात उतरवले आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
१९९९ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवून ते आमदार झाले होते. सलग दोन वेळा मंत्री पद मिळालेल्या राऊतांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ.मिलिंद माने यांनी पराभूत केले. याआधी राऊत यांनी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तसेच अनुसुचित जमाती विभागाचे माजी राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले होते.
हेही वाचा चंदगड विधानसभा मतदार संघातून प्रकाश बांदिवडेकरांनी उमेदवारी केली घोषित
२०१९ लोकसभा निवडणुकीच्या वेळी नितीन राऊत रामटेक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. या निवडणुकीनंतर राऊत यांनी बंडखोरी केल्याचा आरोप करून त्यांना विधानसभेची उमेदवारी नाकरण्यासाठी अनेकांनी फिल्डींग लावली. परंतु, या बंडाळीला आता अपयश आल्याचे चित्र आहे. हायकमांडच्या या निर्णयाने सध्या उत्तर नागपूरमधील नगरसेवक तसेच स्थनिक नेत्यांमध्ये नाराजी आहे. यामुळे विधासभा निवडणुकीत गटबाजीच्या परिणामांचा विचार स्थानिक नेतृत्त्वाला करणे गरजेचे आहे.