नागपूर - शिवसेना सत्तेत असताना देखील शिवसेना कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यात आम्ही अपयशी ठरत होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाला भेटत नव्हते. त्यामुळे आम्हाला आमच्या व्यथा मांडता येत नव्हत्या. त्यामुळे संतापाचा उद्रेक झाल्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन झाले, असे मत आशिष जैस्वाल ( MLA Ashish Jaiswal ) यांनी व्यक्त केले आहे.
आम्हीचं अधिकृत गट - मंत्री पदाच्या शर्यतीत आशिष जैस्वाल यांचे देखील नाव पुढे आले आहे. यावर त्यांना विचारले असता ते म्हणाले की पक्ष मला जो न्याय देईल तो मला मान्य असेल. २०१९ च्या निकालानंतर शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची सर्वानुमते निवड झाली होती. पक्षातील दोन तृतीयांश पेक्षा अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे आमचा गट अधिकृत असल्याचा दावा आशिष जैस्वाल यांनी केला आहे.
हेही वाचा - Chandrasekhar Guruji: प्रसिद्ध ज्योतिषाचार्य चंद्रशेखर यांची हत्या; वाचा, कोण होते चंद्रशेखर गुरुजी