ETV Bharat / city

धक्कादायक... आरोपी जामिनावर सुटताच बलात्कार पीडितेने गळफास घेऊन केली आत्महत्या - Rape Case Vikas Bhujade Nagpur

बलात्कार पीडित सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केलेला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Sep 16, 2021, 5:44 PM IST

नागपूर - बलात्कार पीडित सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केलेला आहे. आरोपीचे नाव विकास भुजाडे (वय २०) असे असून तो बलात्कार पीडित तरुणीचा नातेवाईक आहे. पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती, मात्र न्यायालयाने त्याला जमीन मंजूर केल्याने तो सध्या मोकाट आहे. तरुणीच्या आत्महत्येमागे आरोपीचा सहभाग आहे का? या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

माहिती देताना पोलीस आयुक्त

हेही वाचा - संपूर्ण विचार करूनच अध्यादेश काढण्याचा निर्णय, याला कुणाचा विरोध का असावा, माहिती नाही - अशोक चव्हाण

गेल्या महिन्यात आरोपी विकास भुजाडे याने पीडित अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फूस लावली होती. आरोपीने पीडितेला पळवून नेल्यानंतर या संदर्भात जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी देखील तत्परता दाखवत आरोपीचा शोध सुरू केला होता. पीडित तरुणी आणि आरोपी बंगळुरूला असल्याची माहिती समजताच पोलिसांनी त्याला अटक करून पीडितेची सुटका केली होती. त्यानंतर अल्पवयीन तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी विकास भुजाडेला अटक केली. तपासादरम्यान न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. ११ ऑगस्ट रोजी त्याला न्यायालयाने जमीन मंजूर केला. आरोपीला जमीन मिळाल्याच्या काही तीन दिवसांतच पीडित अल्पवयीन तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

तरुणीच्या आत्महत्येमागे आरोपीचा सहभाग दिसून आला नाही

आरोपी विकास भुजाडे याला ११ ऑगस्ट रोजी न्यायालयातून जमीन मिळाला होता. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत पीडित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे, आरोपीने पीडित तरुणीवर दबाव टाकला का? ज्यामुळे पीडितेने टोकाचे पाऊल उचलले, या बाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना विचारले असता ते म्हणाले की, प्राथमिक तपासात तसे काहीही आढळून आलेले नाही.

हेही वाचा - स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आरक्षण मिळण्याची शक्यता धुसरच!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.