ETV Bharat / city

कारागृहाने फेटाळलेल्या अरुण गवळीच्या संचित रजेला नागपूर खंडपीठाकडून मंजुरी, २८ दिवसांची मिळणार रजा

अरुण गवळीला संचित रजा दिली तर मुंबईची कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, असा मुद्दा राज्य सरकारने न्यायालयात उपस्थित केला.

अरुण गवळी
author img

By

Published : Apr 24, 2019, 1:40 PM IST

नागपूर - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी हा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. कारागृह प्रशासनाने २८ दिवसांची संचित रजा देण्याची गवळीची मागणी फेटाळून लावली होती. गवळीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतल्यानंतर त्याची रजा खंडपीठाने मंजूर केली आहे.

कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी संचित रजा द्यावी, अशी मागणी अरुण गवळीने कारागृह प्रशासनाकडे केली होती. मात्र, कारागृह प्रशासनाने तो अर्ज फेटाळल्याने गवळीने खंडपीठात संचित रजेकरिता अर्ज दाखल केला होता.

नागपूर मध्यवर्ती कारागृह

३० एप्रिलपासून गवळीची संचित रजा मंजूर-

मुंबईत २९ एप्रिल रोजी लोकसभेची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नागपूर खंडपीठाने गवळीला ३० एप्रिलपासून संचित रजा मंजूर केली आहे. यामुळे गवळीला २८ दिवसांसाठी रजा मिळणार आहे. अरुण गवळीला संचित रजा दिली तर मुंबईची कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, असा मुद्दा राज्य सरकारने न्यायालयात उपस्थित केला. यावर बचाव पक्षाने बाजू स्पष्ट करताना म्हटले की, यापूर्वी गवळीला ‘पॅरोल’ किंवा ‘फर्लो’वर सोडण्यात आले. तेव्हा त्याने कुठल्याही नियमांचा भंग केलेला नाही. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून मुंबईत लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर म्हणजेच ३० एप्रिल पासून ही रजा मंजूर करण्यात आली आहे.

Intro:अरुण गवळीची संचित रजा मंजूर;मुंबई लोकसभा निवडणुकी नंतर ३० एप्रिल पासून रजा

नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे.कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी संचित रजा द्यावी अशी मागणी अरुण गवळी ने कारागृह प्रशासना कडे केली होती. मात्र कारागृह प्रशासनाने तो अर्ज फेटाळल्याने गवळींनि न्यायालयात धाव घेत
गवळीने संचित रजेकरिता अर्ज दाखल केला होता
३० एप्रिलपासून गवळीची संचित रजा मंजूर केली आहे
२८ दिवसांसाठी ही रजा असेल २९ एप्रिल रोजी मुंबईत लोकसभा निवडणुका आहेत. Body:जर अरुण गवळीला संचित रजा दिली तर मुंबईची कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते असा मुद्दा राज्य शासनातर्फे न्यायालयासमोर उचलण्यात आला तर या आधी देखील जेव्हा गवळीला ‘पॅरोल’ किंवा ‘फर्लो’वर सोडण्यात आले आहे .Conclusion:तेव्हा त्याने कुठल्याही नियमांचा भंग केलेला नाही अशी बाजू बचाव पक्षा तर्फे करन्यात आली न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून मुंबईत लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर म्हणजेच ३० एप्रिल पासून ही रजा मंजूर केली आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.