नागपुर - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते बहुप्रतिक्षित राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. महाविद्यालयाच्या उद्घाटनानंतर बोलताना अमित शाह यांनी, हे महाविद्यालय सुरू होणे हा देशासाठी गौरवाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा... तिवरे धरण फुटीच्या चौकशीचा अहवाल पंधरा दिवसात सादर करा; मंत्री उदय सामंतांचा आदेश
नागपूर शहराचे नावलौकिक संपूर्ण देशात वाढवणाऱ्या 'राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय' या महाविद्यालयाच्या नव्या प्रशस्त इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. अग्निशमन सेवेसंदर्भात अभ्यासक्रम व प्रशिक्षण चालवण्यासाठी 1950 मध्ये राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाची उत्तर प्रदेशच्या रामपूर येथे स्थापना करण्यात आली होती. मात्र, भौगोलिक परिस्थिती व इतर सुविधांचा विचार करून ही संस्था 1956 मध्ये नागपूरात हलवण्यात आली.
हेही वाचा... दिल्लीचं राजकारण? प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला 'नो एन्ट्री'
नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरात आतापर्यंत हे महाविद्यालय कार्यरत होते. मात्र, मोठ्या व विस्तीर्ण जागेची आवश्यकता भासू लागल्यावर राज नगर परिसरात या संस्थेच्या जागेच्या विकासाला 2010 साली मान्यता देण्यात आली. 43 एकरच्या विस्तीर्ण परिसरात संस्थेचा परिसर व नव्या इमारतीचे काम 2018 साली पूर्ण झाले. काही कारणांनी हा लोकार्पण सोहळा होऊ शकला नव्हता. या ठिकाणी शैक्षणिक वर्ग इमारत, विद्यार्थ्यांचे वसतिगृह, ग्रंथालय, खेळाचे मैदान आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा... 'या' कंपनीला सुमारे १५ हजार कोटी भरण्याची दूरसंचार विभागाने दिली नोटीस
या कार्यक्रमा दरम्यान अग्नी तांडवात नागरिकांचे प्राण वाचवताना स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या अग्नी रक्षकांना मरणोत्तर अग्निशमन सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. या शिवाय या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अग्निशमन विभागाच्या जवानांना सन्मानीत करण्यात आले. राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या 30 अग्निशमन जवान व अधिकाऱ्यांच्या गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पदक देऊन गौरव करण्यात आला.