ETV Bharat / city

नागपुरात रुग्णवाहिकाचा बनल्या शववाहिका

author img

By

Published : Apr 17, 2021, 9:40 PM IST

Updated : Apr 18, 2021, 11:25 AM IST

नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचा तांडव सुरू आहे. मृतदेह नेण्यासाठी शववाहिका मिळत नाही आहे. मिळाली तर त्यांच्याकडून अधिकचे पैसे वसूल केले जात आहे.

नागपुरात रुग्णवाहिकाचा बनल्या शववाहिका
नागपुरात रुग्णवाहिकाचा बनल्या शववाहिका

नागपूर - नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचा तांडव सुरू आहे. मृतदेह नेण्यासाठी शववाहिका मिळत नाही आहे. मिळाली तर त्यांच्याकडून अधिकचे पैसे वसूल केले जात आहे. मानपाकडून मोफत सेवा असली तरी काही खासगी रुग्णालयातून मृतदेह घाटावर नेण्यासाठी जिथे दोन तीनशे रुपये घेतले जात होते. तिथे आता तिप्पट चौपट पैसे मागितले जात आहे.

नागपुरात रुग्णवाहिकाचा बनल्या शववाहिका
नागपूर जिल्ह्यात दररोज 60 ते 70 जण कोरोनामुळे दगावत आहेत. मागील 24 तासात कोरोनाने 79 कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे. या सोबतच इतर नैसर्गिक मृत्यूही होत आहेच. शासकीय रुग्णल्यातून मृतदेह घेऊन जाण्यासाठी 16 शववाहिका आहे. यासोबतच 10 शववाहिका सामाजिक संस्थेच्या सुद्धा आहे. यामुळे हा ताण कमी पडण्यास मदत झाली होती. पण आता ताण वाढत असल्याने अडचणीही वाढत आहे. तेच शहराचा आवाका आणि वाढती मृत्यूसंख्या पाहता संसाधन अपुरे पडू लागले आहे.
भितीपोटी चार माणसे मिळणेही झाले कठीण-
उपराजधानी नागपूरात परिस्थिती कोरोनामुळे चिंताजनक आहे. यात अपुरी आरोग्य सुविधा पाहता कुठे उपचारा अभावी, कुठे भीती पोटी मृत्यू होत आहेत. दुसरीकडे याच भीतीमुळे शहरात कोणी मदतीला येत नसल्याने चार माणसं मिळणेही कठीण झाले आहे. यासाठी मृतदेह अपार्टमेंटमधून खाली आणण्यासाठी असो, की मग वाहनात घेऊन जाण्यासाठी प्रत्यके ठिकाणी पैसे द्यावे लागत आहे. जानेवारीमध्ये परिस्थिती गंभीर नसताना जिथे 500 ते 600 रुपये घेतले जात होते. तिथे आजच्या घडीला वाटेल तसे 1 हजार रुपयांपासून 3 ते 4 हजार रुपये मागितले जात आहे. घाटावर मृतदेह आणि अंत्यसंकर साहित्य सोबत देऊन पैसे मागितले जात आहे. यात बाहेरून आलेल्याना याचा फटका अधिक बसत आहे.

हेही वाचा- कोरोना स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची रात्री 8 वाजता महत्त्वाची बैठक

Last Updated : Apr 18, 2021, 11:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.