नागपूर - शहरात मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. जुलैच्या मध्यातच तलाव भरल्याने परिसराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हौसी पर्यटकांना येथे येण्यास मनाई करण्यात आल्याने अनेकांचा हिरमोड होत आहे.
शहरात मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे परिसरातील पर्यटन स्थळे आकर्षक दिसू लागली आहेत. प्रसिद्ध अंबाझरी तलाव मुसळधार पावसामुळे ओव्हर फ्लो झाल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे या तलावाच सौंदर्य अधिकच मनमोहक ठरत आहे. नागपूरकर या तलावावर फेर फटका मारण्यासाठी येत असतात. परंतू गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे तलाव बंद करण्यात आले होते. त्यामुळे येथे येणाऱ्या नागपूरकरांचा हिरमोड झाल्याचे देखील बघायला मिळाले.
हेही वाचा - 'फडणवीस सरकारच्या काळात खासगी संस्थाना जमिनी दिल्याच्या प्रकरणाची चौकशी करा'
अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होतो, वर्षातील तो क्षण अनुभवण्यासाठी नागपूरकर आतूर असतात. मात्र, यंदा कोरोनामुळे नागपूरकरांचा हिरमोड झाला आहे. खरे तर अंबाझरी तलाव जुलै ते ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पूर्ण क्षमतेने भरतो. परंतु यावर्षी झालेलया समाधानकारक पावसामुळे हा तलाव आताच भरल्याचे दिसून आले आहे.
अंबाझरी तलावातून नागपुरातील बहुतांश भागात पाणी पुरवठा केल्या जातो. त्यामुळे यावर्षी हे तलाव लवकर भरल्याने नागपूरकरांसाठी ही आनंद देणारी बाब ठरत आहे. असे असले तरी कोरोनामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी मात्र बंद आहे. मात्र, नागपूरकांना आशा आहे, की परिस्थिती नियंत्रणात येईल आणि त्यांना सौदर्यांचा आनंद अनुभवता येईल. असे मत येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - केवळ १५० ते २०० रुपयात 'ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन'; ग्रामीण भागातील शाळांना देणार तंत्रज्ञान