ETV Bharat / city

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी नागपूरसाठी काय केलं - अजित पवार

फडणवीस यांच्या 5 वर्षांच्या कार्यकाळाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. 2014 मध्ये राज्यात भाजपची सत्ता आली तेव्हा वाटले होते की आता नागपूरचे भले होईल, मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नागपूरात गुन्हेगारी वाढली. त्यांच्याच काळात नागपूर शहर क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जाऊ लागलं.

देवेंद्र फडणवीसांनी नागपूरसाठी काय केलं
देवेंद्र फडणवीसांनी नागपूरसाठी काय केलं
author img

By

Published : Feb 8, 2021, 2:49 AM IST

Updated : Feb 8, 2021, 3:56 AM IST

नागपूर- ज्या नागपूर शहराने फडणवीस यांना कमी वयात महापौर केले. मात्र, फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर त्या शहरासाठी काय केले? असा सवाल उपस्थिक करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. ते नागपूरमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बोलत होते.

फडणवीसांनी नागपूरसाठी काय केलं

२०२२ मध्ये होऊ घातलेल्या नागपूर महानगर पालिका निवडणुकीच्या तयारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवात केली आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत नेत्यांच्या इनकमींगला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत रविवारी नागपूर महापालिकेतील अपक्ष नगरसेविका आभा पांडे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी अजित पवार यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला.

फडणवीसांच्या काळात नागपूरची ओळख क्राईम कॅपिटल-

यावेळी बोलताना अजित पवार यांनी फडणवीस यांच्या 5 वर्षांच्या कार्यकाळाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. 2014 मध्ये राज्यात भाजपची सत्ता आली तेव्हा वाटले होते की आता नागपूरचे भले होईल, मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नागपूरात गुन्हेगारी वाढली. त्यांच्याच काळात नागपूर शहर क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जाऊ लागलं. त्यांनी आपल्या फायद्यासाठी गुंड वृत्तीच्या लोकांना महामंडळे दिली, लाल दिव्यांची गाडी दिली, असा आरोप करत अजित दादांनी सत्तेचा वापर असा करावा लागतो का? असा प्रश्नही उपस्थित केला.

महापालिकेत १५ वर्षांपासून भाजपची सत्ता

नागपूर महापालिकेत भ्रष्टाचार सुरू असून त्याचे पुरावे समोर आल्यास कारवाई करू, असा इशाराही अजित पवार यांनी दिला. मागील 5 वर्ष केंद्रात भाजपची सत्ता होती, राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, ऊर्जा विभाग, अर्थ विभाग, गृह विभाग सर्व काही नागपुरात असताना या लोकांनी नागपुरात विकासाचे कोणते काम केले? आता नागपूरच्या लोकांनीच हे प्रश्न विचारले पाहिजेत, असेही अजित पवार म्हणाले. नागपूर महापालिकेत भाजपची गेले 15 वर्ष सत्ता असली तरी कुणीही ताम्रपट घेऊन आलेला नाही. सत्ता येत असते, जात असते, कोणीही कायम सत्तेत नसतो. त्यामुळे भाजपने सत्तेचा आव आणत कामा नये, असे सांगताना अजित पवारांनी 'अभी तो ये बस शुरूवात है, आगे आगे देखो होता है क्या? असा गर्भित इशाराही भाजपला दिला.

गडकरींनी नागपूरसाठी काहीच केलं नाही- प्रफुल्ल पटेल

याच कार्यक्रमात बोलताना प्रफुल्ल पटेल यांनीही देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी गेले 7 वर्ष केंद्रात मंत्री असताना नागपुरात काही सिमेंटचे रस्ते आणि फ्लायओव्हरच्या शिवाय कुठलेही काम झाले नसल्याचा आरोप केला.

Last Updated : Feb 8, 2021, 3:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.