नागपूर - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Former Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी मुलाखत द्यायची आणि त्यानंतर त्यांच्यावर वक्तव्य करत हल्ला चढवायचा, यातून राज्याचे प्रश्न सुटणार नाही. तसेच राज्यात 10 लाख हेक्टर शेत पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना जी भरीव मदत मिळायला पाहिजे होती, ती अद्याप मिळाली नसल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar ) यांनी केले आहे. शेतकऱ्याच्या ( farmer ) बांधावर जाणून घेऊन प्रश्न अधिवेशनात लावून धरु असा इशारा राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नागपुरात दिला आहे. ते 3 दिवसीय नागपूर, ( Nagpur Airport ) विदर्भाच्या दौऱ्यावर ( Vidarbha tour ) असून ते माध्यमांशी नागपूरात बोलत होते.
या कारणांसाठी दौरा असल्याचे सांगितले - विरोधी पक्ष नेते अजित पवार हे उद्यापासून ( Ajit Pawar on farmers issue ) 4 दिवसीय विदर्भ तसेच मराठवाड्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. या 4 दिवसात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेणार आहे. तसेच प्रशासकीय स्तरावर असलेले प्रश्नही समजून घेऊन ते अधिवेशनात मांडायला सोपे जातात त्यासाठी हा दौरा असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. दुसरीकडे मात्र सत्तेतून विरोधात जाताच सरकारला नैसर्गिक संकटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोंडीत पकडण्याची तयारी या माध्यमातून केली जात आहे असे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचा आरोप - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री वेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी गडचिरोली भागाचा दौरा केला होता. मात्र त्यावेळेस पूरपरिस्थिती असल्याने त्यांना दुर्गम भागात जाऊन वास्तविक परिस्थिती पाहता आली नाही. तसेच शेतकऱ्यांना जी मदत मिळणे अपेक्षित होती, ती देखील मिळाली नसल्याचा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला आहे. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी आधीच केली आहे. पहिली पेरणी वाया गेली, दुपार पेरणी झाली. आता मात्र शेतीची परिस्थिती गंभीर झालेली आहे. रस्त्यांची दुर्दशा झाली, पूल वाहून गेले आहेत. या परिस्थितीत लवकरात- लवकर भरीव मदत मिळण्याची गरज आहे. राज्यात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना एसडीआरएफचे निकष बाजूला ठेवून दुप्पट- तिप्पट मदत शेतकऱ्यांना देण्याचा काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. या परिस्थितीमुळे मराठवाड्यात मागील काही दिवसात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या गंभीर घटना घडल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
पक्षश्रेष्ठींना देशाचा कारभार सांभाळावा लागतो- राज्याचा कारभार दोघेचं पाहत असताना मंत्रिमंडळाचा विस्तार का करत नाही, असाही सवाल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. मला माहिती आहे की आज मुख्यमंत्री दिल्लीत जाणार होते. पण दिल्लीतही जात असले, तरी तेथे ज्यांना भेटायच आहे. ते पक्षश्रेष्ठींना देशाचा कारभार सांभाळावा लागतो. त्यामुळे वेळ मिळणे कठीण जात असावा असेही ते म्हणाले आहेत. त्यावर टीका करायचं काही कारण नाही. मात्र, जनतेचे प्रश्नाचा विचार करता लवकरात- लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा असे राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार म्हणाले आहेत. आम्ही अधिवेशन बोलवा अशी मागणी केली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेच सर्वच विभागाचा कारभार पाहत आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणात कामकाज सांभाळणे हे दोघांसाठी अशक्य असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.
...म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही ?- मंत्रिमंडळाचा विस्तार न होण्यामागे सत्ता बदल होत असताना मोठ्या प्रमाणात आश्वासन हे शिंदे गटातील आमदारांना दिली होती. मात्र, आता ती आश्वासन पूर्ण होतांना दिसून येत नाही. त्या आश्वासनाची पूर्तता करणे कठीण होत आहे.मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही का ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. भाजपकडे 115 आमदार आहेत. भाजपच्या कार्यकरणीमधील रोख पाहता आमदारांना त्यागाची भावना ठेवावी असे सांगण्यात येत आहे. तेच शिंदे गटातून कोण मंत्री कोण राज्यमंत्री होणार आहे. अशा अनेक प्रश्न असल्यामुळे विस्तार होत नसावा, असेही विरोधी पक्ष नेते अजित पवार माहिती असल्याचे म्हणत बोलून गेले आहे.
हेही वाचा - Uddhav Thackeray Birthday : प्रतिज्ञापत्र, शिवसैनिकांची भेट, आपुलकीचा संवाद; वाढदिवस मात्र निमित्त...?