ETV Bharat / city

दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ नागपुरात किसान संयुक्त मोर्चाच्यावतीने आंदोलन - दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ उपवास

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात संविधान चौकात किसान संयुक्त मोर्च्याच्यावतीने आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधींच्या हुतात्मा दिनानिमित्त एक दिवसाचा उपवास ठेवून हे आंदोलन केले.

protest
किसान संयुक्त मोर्चाच्यावतीने आंदोलन
author img

By

Published : Jan 31, 2021, 2:35 AM IST

नागपूर - दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात संविधान चौकात किसान संयुक्त मोर्च्याच्यावतीने आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधींच्या हुतात्मा दिनानिमित्त एक दिवसाचा उपवास ठेवून दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनातील पोलिसांच्या दंडुकेशाहीचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारवर टीका करत निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले.

प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी घेतलेला आढावा

एक दिवस उपवास करत केले आंदोलन

दिल्लीत मागील दोन महिन्यांपासून आंदोलन शांततेत केले जात आहे. पण, यात 26 जानेवारीला जे झाले हे सरकारचे षडयंत्र आहे. यात जाणीवपूर्वक त्यांना परवानगी देऊन बदनाम करण्याचा घाट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलनात राकेश टिकैत यांना पोलीस फोर्सने ज्या पद्धतीने आंदोलन स्थळावरून हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे जसे ते आतंकवादी आहेत. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी गांधीजींच्या हुतात्मा दिनी एक दिवस उपवास ठेवत किसान संयुक्त मोर्च्याच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. यात अनेक संघटनांनी सहभाग नोंदवला.

गांधीजी पंतप्रधान यांना सद्बुद्धी द्या -

या आंदोलनात शेतकरी नेते, अभ्यासक विजय जावंधिया यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. देशाचे पंतप्रधान हे महात्मा गांधींच्या गुजरात राज्यातील आहेत. गांधीजींना प्रार्थना करतो की हे आंदोलन शिखांचे आहे असे म्हणत हिंदूंना पुढे उभे करून जो काही फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, यासाठी पंतप्रधान यांना सद्बुडी द्या, अशी प्रार्थना करत असल्याचे शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केली. मोदीजी हे सगळं करून निवडणुका जिंकता येईल पण लोकनेता बनता येणार नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी आंदोलनात प्रामुख्याने किसान संयुक्त मोर्च्याचे अॅड अनिल काळे, प्रजवला तट्टे, शेतकरी नेते अविनाश काकडे, कांचन अढाउ, सीमा थोरात, यशवंत चितळे, बंडू मेश्राम, यासह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.