नागपूर - आज देशभरात वाढती महागाईला धरून काँग्रेसच्या वतीने आंदोलन ( Congress aggressive against inflation ) करण्यात आले. नागपुरात शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन ( Congress workers agitation ) करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष गिकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्यने पदाधिकरी उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतांना बॅरिकेटिंग करण्यात आले होते. यावेळी काही पदाधिकरी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा - Priyanka Gandhi Detain : महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसच आंदोलन; प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात
विरोधकांचा आवाज दाबण्याचे शडयंत्र - मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली असून लुटण्याचे काम मोदी सरकारकडून केली जात आहे. पेट्रोल डिझेलचे दर 100 पार झाले, गॅस सिलेंडर हजारी पार झाले, जीएसटी लावून लोकांना लुटण्याचे काम करत असल्याचा आरोप करत विरोधक आंदोलन करत असल्याने त्यांचा आवाज दाबण्याचे काम मोदी सरकार करत असल्याचा आरोप आमदार तथा विकास ठाकरे यांनी केला आहे. यामुळे या विरोधात देशभरात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात मोठया संख्यने पदाधिकरी यांनी सहभाग घेतला असून महिला पदाधिकरी यांनीही जोरदार घोषणाबाजी करत लक्ष वेधून घेतले. तसेच यावेळी एकाने अंगांत भाजीपाल्याचा हार घालून डोक्यावर राजा मुकुट घालून लक्ष वेधले.
दरम्यान, महागाईसह देशातील महत्त्वाच्या मुद्यांवर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेसने आज महागाईच्या विरोधात देशव्यापी आंदोलनाला ( Congress Agitation Against Inflation ) सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या खासदारांनी संसद भवनासमोर आंदोलन केले. त्यानंतर राष्ट्रपती भवनापर्यंत काँग्रेसच्या खासदारांनी रॅली काढली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी ( Congress president Sonia Gandhi ) आणि काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी ( Congress leader MP Rahul Gandhi ) या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत.
संसद भवनासमोर निदर्शने - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात संसद भवनासमोर काँग्रेसच्या खासदारांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनात काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. काळा पेहराव करीत काँग्रेसने सरकारचा निषेध केला. माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसने नेते पी. चिदंबरम यांनी हे आंदोलन महागाई आणि अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ सुरू असल्याचे सांगितले.
राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा - संसद भवनासमोर आंदोलन केल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी आपला मोर्चा राष्ट्रपती भवनाकडे वळविला. संसद भवन ते राष्ट्रपती भवन अशा खासदारांच्या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस नेते राहुल गांधी हे करीत आहेत. तत्पूर्वी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत सरकारवर घणाघाती हल्ला केला.
हेही वाचा - RBI hikes repo rate: रिझर्व बँकेने रेपो दर 50 बेस पॉईंटने वाढवला, कर्जे महागणार