नागपूर - नागपुरात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी न मगितल्याने आज पुन्हा आंदोलन करण्यात आले. यावेळी नागपूरच्या रेशिमबाग चौकात नाभिक समाजाने ( Nabhik Ekta Manch agitation nagpur ) केलेल्या आंदोलनात मंत्री दानवे यांचा अर्धी मिशी असलेला बॅनर घेऊन निषेध करण्यात आला. तसेच, माकडाचा फोटो लावलेला बॅनर घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा - 'त्या' वाघाचा मृत्यू विद्युत शॉकमुळे झाला, अहवालातून स्पष्ट
भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त करत आंदोलन करण्यात आले होते. जाहीर माफी मागावी, असेही आवाहन करण्यात आले होते. पण, 20 मार्च पर्यंत दिलेल्या काळात माफी न मगितल्याने आज संतप्त नाभिक समाजाने पुन्हा नागपुरात आंदोलन केले. यानंतर दानवे यांनी माफी मागितली नाही, तर रेल रोको करू, असा इशारा महाराष्ट्र नाभिक एकता मंच सलून पार्लर असोसिएशनच्या दक्षिण पश्चिम विभाग नागपूरच्या वतीने देण्यात आला.
काय म्हणाले होते दानवे?
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारची अवस्था तिरुपती येथील न्हाव्यांसारखी झाली आहे. तिरूपतीमधील न्हावी डोक्यावर दोन-दोन वस्तारे हाणून ग्राहकांना बसवून ठेवतात. तसेच, काम महाविकास आघाडीचे झाल्याची टीका केली होती. दानवे यांनी केलेल्या या वक्तव्याच्या निषेधार्थ नाभिक समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली होती.
हेही वाचा - Good news for NCC students : एनसीसीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; पोलीस भरतीत मिळणार अधिक गुण