ETV Bharat / city

Ujjwal Nikam on shivsena : शिवसेना नेमकी कुणाची? ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिले 'हे' उत्तर - ujjwal nikam latest news

शिवसेना पक्षावर उद्धव ठाकरे यांचाच दावा मजबूत असल्याचे त्यांनी ( Ujjwal Nikam on maharashtra government ) सांगितले. या शिवाय बंडखोर आमदार आपला गट दुसऱ्या पक्षात विलीन करतील ही देखील शक्यता फार कमी असल्याचे ते म्हणाले.

ujjwal nikam on maharashtra government
शिवसेना पक्ष दावा उज्ज्वल निकम
author img

By

Published : Jun 30, 2022, 1:05 PM IST

नागपूर - शिवसेना पक्ष नेमका कुणाचा? या प्रश्नाचे उत्तर उभ्या महाराष्ट्राला हवे आहे. हा पेच कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहे, त्यामुळे यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे मत जाणून घेतले. यावर शिवसेना पक्षावर उद्धव ठाकरे यांचाच दावा मजबूत असल्याचे त्यांनी ( Ujjwal Nikam on maharashtra government ) सांगितले. या शिवाय बंडखोर आमदार आपला गट दुसऱ्या पक्षात विलीन करतील ही देखील शक्यता ( Ujjwal Nikam latest news ) फार कमी असल्याचे ते म्हणाले.

माहिती देताना ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम

हेही वाचा - Atul Londhe : राज्यपाल या संस्थेचा असंवैधानिक दुरुपयोग - अतुल लोंढे

आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बंडाळीचा सामना शिवसेना पक्ष करत आहे. तब्बल 40 आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांना नाईलाजाने मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर देखील अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामध्ये शिवसेनेतील बंडाळीनंतर शिवसेना पक्ष कुणाचा? यावरून नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे बंडखोर आमदारांच्या गटाकडे दोन तृतीयांश आमदार असल्याने आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे उत्तराधिकारी आहोत, असा दावा केला जात आहे. तर, दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे भविष्य असल्याचा दावा शिवसैनिकांनी केला आहे.

शिंदे गटाला दुसऱ्या पक्षात विलीन होण्याची गरज नाही - शिवसेनेसोबत बंड करून बाहेर पडलेल्या आमदारांना गट स्थापन करून एखाद्या राजकीय पक्षात विलीन व्हावे लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले की, बंडखोर आमदारांना आपला गट कोणत्याही पक्षात विलीन करण्याची कुठलीही आवश्यकता नाही. ते शिवसेनेतून बाहेर गेले नाहीत.

भाजपला बहुमत सिद्ध करावे लागेल - महाविकास आघाडीकडे बहुमताचा आकडा नसल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतःहून पदावरून पायउतार झाले आहे. त्यामुळे, आता राज्यपाल २०१९ च्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करण्याकरिता आमंत्रण देऊ शकतात. त्यानंतर भाजपला सुद्धा विधानभवनात बहुमत सिद्ध करावे लागेल. त्यानंतर नवीन सरकार खऱ्या अर्थाने अस्तित्वात येईल, असे देखील ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले.

हेही वाचा - Why Shiv Sena Did Not Grow Vidarbha : विदर्भात शिवसेनाची वाढ आणि विस्तार का झाला नाही, हे आहे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.