ETV Bharat / city

ग्राहकानेच ऑनलाईन वस्तू विक्री करणाऱ्या कंपन्यांना लावला चुना; आरोपी अटकेत - Online fraud news

नागपुरातील एका भामट्याने चक्क पार्सल डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करून, त्या पार्सलमधून महागडी वस्तू काढून त्यात साबण ठेऊन ते पार्सल सध्या पैसे नसल्याचं कारण देत परत केल्याची घटना उघडकीस आली आहे.

nagpur crime
आरोपी अटक
author img

By

Published : Aug 23, 2021, 4:43 PM IST

Updated : Aug 23, 2021, 5:40 PM IST

नागपूर - ऑनलाईन अॅप्लिकेशनवरून मागवलेल्या महागड्या वस्तूंच्या ऐवजी साबण किंवा दगड निघाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, नागपुरातील एका भामट्याने चक्क पार्सल डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करून, त्या पार्सलमधून महागडी वस्तू काढून त्यात साबण ठेऊन ते पार्सल सध्या पैसे नसल्याचं कारण देत परत केल्याची घटना उघडकीस आली आहे. या आरोपीने एक-दोनदा नाही तर अनेकवेळा अशा प्रकारची हातचलाखी करून अनेक कंपन्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी
  • आरोपीला अटक -

या संदर्भात अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संयमाने तपास करत आरोपीला रंगेहाथ अटक केली आहे. पवन श्रीपाल असे आरोपीचे नाव आहे. त्याने पैसे कमावण्यासाठी फसवणुकीची शोधून काढलेली पद्धत बघून पोलीस देखील चक्रावले आहेत.

हेही वाचा - राज्य सरकार केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात व्यस्त, शेतकऱ्यांकडे त्यांचे लक्ष नाही -फडणवीस

सध्याच्या काळात ऑनलाईन वस्तू खरेदी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, ऑनलाईन वस्तू खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहक खरेदी करताना अनेक प्रश्न डोक्यात ठेऊन खरेदी करत असतात. नागपूरच्या अंबाझरी पोलिसांनी आरोपी पवन श्रीपाल याला अटक केली आहे. त्याने चक्क ऑनलाईन कंपन्यांना लाखो रुपयांचा चुना लावला आहे. पवन ऑनलाईन साईटवरून महागड्या डिजिटल वस्तू ऑर्डर करायचा. डिलिव्हरी बॉय डिलिव्हरी द्यायला आला की त्याला 5 मिनिटं थांबवून ठेवायचा. नंतर आपल्या गाडीत बसून त्यातील सामान काढून घेत व त्यात साबणसारख्या वस्तू भरून ठेवायचा. सध्या पैसे नसल्याचे कारण देत त्या वस्तू डिलिव्हरी बॉयकडे परत करायचा, असा गोरखधंदा पवन गेल्या काही महिन्यांपासून करत होता.

  • महागडे डिजिटल गॅजेट जप्त --

पवन विरोधात एक तक्रार अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल होताच, पोलिसांनी पवनला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली. पोलिसांनी त्याच्या जवळून इलेक्ट्रॉनिक गॅझेटसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ज्यामध्ये मोबाईल, टॅब, आयफोन, आयपॅड, डिजिटल घड्याड, हेडफोन, ब्लूटूथ स्पीकर आणि त्याच्या कारचा देखील समावेश आहे.

हेही वाचा - ...म्हणून शिवसेना आमच्या विरोधात बोलणार नाही - नारायण राणे

Last Updated : Aug 23, 2021, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.