नागपूर - नागपूरमध्ये कोरोनाबाधितांसाठी बेड अपुरे पडत आहेत. आरोग्य व्यवस्था कोलमडली असल्याचे चित्र आहे. नागपुरात उपचार मिळणे कठीण झाले आहे. यात मागील 24 तासात 74 रुग्ण दगावले आहेत. नव्या 5 हजार 813 बाधितांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. पण या तुलनेत आरोग्य व्यवस्था तोकडी पडत चालली आहे. यामुळे परिस्थिती बिकट होत आहे. जिल्ह्यात 22 हजार 575 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या परिस्थिती नागपूर शहरात 3 हजार 458 बधितांची भर पडली आहे.
हेही वाचा-कोविड सेंटर रिअॅलिटी चेक : मुलुंड कोविड सेंटरमध्ये 450 खाटा रिक्त
आजवर एकूण 3 लाख 2 हजार 849 कोरोनामुक्त
ग्रामीण भागात 2 हजार 350 यासह बाहेर जिल्ह्यातील 5 बाधितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच 75 मृत्यूपैकी 39 मृत्यू शहरातील 30 ग्रामीण भागात तर 5 बाहेर जिल्ह्यातील रुग्ण दगावले आहेत. आजतागायत 5 हजार 813 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यात 64 हजार 110 रुग्ण सक्रिय आहेत. तर 3 लाख 2 हजार 849 हे कोरोनामुक्त झाले आहेत.
हेही वाचा-'सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर टीका करणारे भाजपा नेते दळभद्री'
पूर्व विदर्भात 9 हजार 323 कोरोनाबाधितांची भर
पूर्व विदर्भात सहा जिल्ह्यात सर्वाधिक अश्या 121 जण कोरोना दगावले आहेत. यात नागपूर जिल्ह्यात 5 हजार 813 जण पॉझिटिव्ह आहेत. 74 जण दगावले आहेत. भंडारा जिल्ह्यात 1 हजार 262 कोरोनाबाधित आहेत. तर 22 जण दगावले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात 1 हजार 171 बाधित तर 16 जणांचा मृत्यू झाला आहे. गोंदिया 610 जण बाधित 9 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ध्यात 293 बाधित तर गडचिरोली मध्ये 174 बधितांची नोंद झाली आहे. पूर्व विदर्भात 9 हजार 323 बाधितांची भर पडली आहे. तर 6 हजार 414 जणांना बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात लोकांनी जबाबदारीने वागून नियमांचे पालन केले नाही तर, परिस्थिती बिकट होत जाईल असे चित्र निर्माण झाले आहे.