नागपूर - जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होत आहे. त्यामुळे उपराजधानीतील भयावह परिस्थिती समोर येत आहेत. गुरुवारी आलेल्या आकडेवारीत 5 हजार 514 कोरोना बाधितांची भर पडली आहे. मागील 24 तासात तब्बल 73 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.
जिल्ह्यात एका दिवसात 73 जण कोरोनामुळे दगावले असल्याने परिस्थिती भयावह होत असल्याचे स्पष्ट होत आहे. वाढत्या मृत्यूदारावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय पथकाने गुरुवारी आढावा घेत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यास सांगितले आहे. तर पूर्व विदर्भातही 8, 439 बाधितांसह 89 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा-शरद पवारांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी चर्चा; सामूहिक सहकार्याची करून दिली आठवण
अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 45 हजारांच्या घरात!
नागपूर जिल्ह्यात दररोज साधारण 3 ते 4 हजार नवीन कोरोनाबधिता आढळत आहेत. मागील दोन दिवसात हा आकडा पाच हजारांहून अधिक झाला आहे. नागपूर जिल्ह्यात 19 हजार 176 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये शहरात 2 हजार 881 तर ग्रामीणमध्ये 2 हजार 628 कोरोनाबाधित मिळून आले आहेत. तेच शहरात 40 जण, ग्रामीणमध्ये 28 तर बाहेर जिल्ह्यातील 5 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 45 हजार 97हून अधिक झाली आहे.
हेही वाचा-कोरोनारुग्णांमध्ये वाढ मात्र रेमडेसिवीरसह लसीचा राज्यात तुटवडा
विदर्भातील सहा जिल्ह्यांत कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ सुरुच
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती भयावह होत चाललेली आहे. जिल्ह्यात 5 हजार 514, भंडाऱ्यात 1 हजार 42, चंद्रपूरमध्ये 688, गोंदियात 570, वर्ध्यात 429, गडचिरोलीत 196 बाधित मिळून आले आहेत. यात बुधवारी आलेल्या आकडेवारीत 91 जण कोरोनाने दगावले आहेत. 8 दिवसात 449 जण नागपूर जिल्ह्यात दगावले आहेत. यात 4 हजार 100 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत.
8 एप्रिलची नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती
- आज आढलेले कोरोना बाधित- 5 हजार 514
- आज कोरोना मुक्त झालेले रुग्णांची संख्या - 3 हजार 277
- आज कोरोनामुळे 73 जण दगावले - 8 दिवसात 449 जणांचा मृत्यू
- आजच्या तारखेत 45 हजार 97 सक्रिय रुग्ण
- आजपर्यंत 5 हजार 577 जणांचा मृत्यू
राज्यात 56 हजार 286 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
गेल्या 24 तासांत राज्यात 56 हजार 286 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यावरून राज्यातील कोरोनाच्या भयावह परिस्थितीचा अंदाज येईल. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आज 376 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 1.77 टक्क्यांवर पोहोचला आहे.