ETV Bharat / city

नागपुरात कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवसात आढळले सुमारे 2 हजार कोरोनाबाधित

मागील दोन आठवड्यापासून शनिवार, रविवार हे दोन दिवस बाजरापेठा बंद करत कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न झाला. पण यात कोरोनाच्या रुग्णसंख्या नियंत्रणात येत नसल्याचे दिसून आले. या उलट बाधित रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. अखेर प्रशासनाने संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपुरात कोरोनाचा उद्रेक
नागपुरात कोरोनाचा उद्रेक
author img

By

Published : Mar 12, 2021, 7:08 AM IST

Updated : Mar 12, 2021, 7:50 AM IST

नागपूर - गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असताना गुरुवारी जिल्ह्यात तब्बल 1979 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. तर पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 2475 रुग्णाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात 15 मार्च ते 21 मार्च या काळात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घेतले कठोर निर्णय-

मागील दोन आठवड्यापासून शनिवार, रविवार हे दोन दिवस बाजरापेठा बंद करत कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न झाला. पण यात कोरोनाच्या रुग्णसंख्या नियंत्रणात येत नसल्याचे दिसून आले. या उलट बाधित रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. त्यावर अखेर प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेत नागपुरात कडक संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली. या सात दिवसात शहरातील सर्व कामकाज बंद ठेवण्यात येणार असून विनाकारण फिरणाऱ्यावर निर्बध लादण्यात आले आहे.

नागपुरात कोरोनाचा उद्रेक
अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 13 हजाराच्या घरात-नागपूर जिल्ह्यात गुरुवारी 1979 नवे कोरोनाबाधित आढळून आले. यात 1603 रुग्ण नागपूर मनपा क्षेत्रात आढळून आले आहेत. तेच ग्रामीण भागात 373 रुग्ण बाधित झाले आहेत. मागील 24 तासात 10 हजार लोकांची कोरोना चाचणी झाली असून यात कोरोना बाधित अॅक्टिव्ह रुग्णाची संख्या 13 हजार 188 इतकी झाली आहे.नागपूर वर्धामध्ये रुग्ण वाढ अधिक-

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात नागपूरनंतर वर्धा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येत होणारी वाढ अधिक आहे. यात गुरुवारी ६ जिल्ह्यात एकूण 2475 रुग्ण कोरोना बाधित मिळून आले असून 1429 जणांना कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात 1979, भंडारा 61, चंद्रपूर 96, गोंदिया 16, वर्धा 306 जण कोरोना बाधित असून तेच गडचिरोली जिल्ह्यात 17 कोरोना बाधित मिळून आले आहे.

Last Updated : Mar 12, 2021, 7:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.