नागपूर - रविवारी नागपुरात सहा नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर सहा रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात केली आहे. नागपुरात एकूण 423 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कोरोनाबाधित झालेल्या पोलीस जवानांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांना रविवारी मेयो रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी आणि एक एसआरपीएफ जवानाचा समावेश आहे. प्रतिबंधित क्षेत्रात ड्युटीवर असताना तीन पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते.
रविवारी एकूण पाच कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे एकूण डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या ३४१ इतकी झाली आहे. तर कोरोनाबाधित नवीन सहा रुग्णांची भरदेखील पडली आहे, ज्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४२३ झाली आहे.
सध्या नागपुरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे निदर्शनात येत असले तरी प्रतिबंधित क्षेत्रांमधून अजूनही कोरोनाबाधित रुग्ण पुढे येत आहेत. सध्या नागपुरात एकूण रुग्ण संख्या ४२३ झाली असली तरी ३४१ रुग्ण कोरोनामुक्तदेखील झाले आहेत. टक्केवारीच्या हिशोबाने बघितल्यास एकूण 80 टक्के रुग्ण बरे झालेले आहेत, तर सात रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे.