नागपूर- राज्याच्या उपराजधानीत कोरोनाचा कहर सुरुच आहे. नागपूरात ५७ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल ५, ९९३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांची संख्या ४०, ८०७ इतकी झाली आहे.
संपूर्ण नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे. एकीकडे कोरोनाबधितांचा आकडे सुसाट वेगाने वाढत असल्याने सरकारी आणि खासगी रुग्णालयात एकही बेड उपलब्ध नसल्याची भीषण परिस्थिती आहे. बुधवारी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात ५,९९३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ६३, ००५ इतकी झाली आहे. आज बाधित झालेल्या नागरिकांमध्ये २, ३७५ रुग्ण ग्रामीण नागपूरचे तर ३६१३ रुग्ण हे नागपूर महानगरपालिका हद्दीतील आहेत. आज ५७ कोरोनाबधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूची संख्या ही ५, ९६० इतकी झाली आहे. मृतांमध्ये १७ रुग्ण हे नागपूरच्या ग्रामीण भागातील आहेत. तर ३५ रुग्ण हे शहरातील आहेत. याशिवाय मृतामध्ये जिल्ह्याबाहेरील ५ रुग्णांचा समावेश आहे.
हेही वाचा-आई मी मरत आहे, तू आनंदी राहा... असे शाळेच्या बोर्डावर लिहून विद्यार्थ्याची आत्महत्या
आज २१, ५५८ चाचण्या
नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल २१, ५५८ इतक्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये १४, ४७५ इतक्या आरटीपीसीआर आणि ७०८३ अँटीजेन टेस्टचा समावेश आहे. चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्याने रुग्णसंख्यादेखील वाढत आहेत.
हेही वाचा-हनिमून टूर पॅकेजमध्ये निघाले चरस; नवविवाहित जोडपे थेट कतारच्या तुरुंगात!