नागपूर - शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुकरेजा नगरात राहणाऱ्या एका व्यापार्याच्या घरी धाडसी चोरी ( merchant house theft in Nagpur ) झाली आहे. चोरट्याने 25 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिन्यांसह पाच लाख रुपयांची रोकड मिळून 30 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास ( 30 lakh stolen from merchant house ) केला आहे. विजय गोविंदराव कटारिया असे फिर्यादी व्यापाऱ्याचे नाव आहे,त्यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद केला असून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.
30 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला - विजय कटारिया जरीपटका भागातील व्यापारी आहेत, त्यांचे कुक्रेजा नगर हाउसिंग बोर्ड कॉलनी येथे निवास स्थान आहे. निवासी इमारतीच्या ग्राउंड फ्लोरवर त्यांचे डेली निड्सचे दुकान आहे तर वरच्या माळ्यावर विजय कटारिया हे कुटुंबीयांसह राहतात. काल रात्री कटारिया यांच्या कुटुंबातील सर्व मंडळी झोपी गेली असताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला, आणि घरात ठेवलेली पाच लाख रुपयांची रक्कमसह 440 ग्रॅम सोन्याचे आणि चांदीचे दागिने असा एकूण सुमारे 30 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. सकाळी जेव्हा विजय कटारिया यांना जाग आली. तेव्हा घरातील समान अस्ताव्यस्त फेकलेले होते, त्यांनी घरातील दागिने आणि रोकड तपासली असता चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांचा तपास सुरू - कुक्रेजा नगर हाउसिंग बोर्ड कॉलनी राहणारे विजय कटारिया यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती समजताच जरीपटका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चोरीच्या घटनेचा तपास सुरू केला असून परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारच्या काही घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये साम्य आढळून येत असल्याने पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे.
हेही वाचा - त्यांना जे म्हणायचे आहे ते म्हणू द्या, आमचे खांदे मजबूत.. संजय राऊतांवरील याचिकेवर उच्च न्यायालयाचे मत