नागपूर - तीन दिवसांवर फ्रेंडशिप-डे आला असताना नागपुरात मात्र मैत्रीच्या नात्याचा काळिमा फासणारी घटना घडली आहे. दोन मित्रांनी विश्वसाचा गैरफायदा घेत जिवलग मैत्रीणीला बळजबरीने दारू पाजून बलात्कार केल्याची संतापजनक घटना नागपुरात घडली. निखिल सोमकुवर व वतन गोमकाळे अशी आरोंपीची नावे असून, त्यांना तत्काळ अटक करण्यात आली आहे.
पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडित तरुणीच्या मामाच्या मित्राला ती ओळखत होती. या ओळखीतून दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. काही दिवसांपूर्वी तरुणीच्या घरी कोणीही नसताना आरोपी निखिल सोमकुवर घरी भेटायला गेला. त्यावेळी पहिल्यांदा दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. यानंतर, पीडित तरुणीचा विरोध नसल्याने आरोपीचे मनोबल उंचावले होते. 8 दिवसांपूर्वी आरोपी पुन्हा या तरुणीच्या घरी गेल्यावर त्याने स्वतःच्या मित्राला सोबत नेले. त्यावेळी दोघांनी जबरदस्तीने पीडितेला दारू पाजून ती नशेत असताना बलात्कार केला. यानंतरही ही तरुणी गप्पच होती. मात्र, काल दि.३१जुलै प्रकृती अचानक खालावल्याने तरूणीच्या पालकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यावर संबंधित घटनेचा खुलासा झाला आहे.
या सर्व प्रकारानंतर पीडितेने बलात्काराची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी निखिल सोमकुवर आणि वतन गोमकाळे यांना अटक केली आहे.