नागपूर - देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण करून आज परत नवा संकल्प केला पाहिजे. वर्षानुवर्षे संकल्प केल्यामुळेच आज काश्मीरमधून कलम 370 हटवू शकलो, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. यावेळी संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशीदेखील उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयात सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांचीही प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सरसंघचालक मोहन भागवत आणि सर कार्यवाह भय्याजी जोशी यांनी जम्मू-काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतर प्रतिक्रिया दिली. यापूर्वीच आर्टिकल ३७० हटवायला हवे होते, असे म्हणत, सरकारचे काम योग्य दिशेने सुरू असल्याची पावतीही त्यांनी सरकारला दिली.