नागपूर - कोरोना बधितांची संख्येत पूर्व विदर्भात सोमवारी पुन्हा 1561 रुग्णाची भर पडली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यात 1276 नवे कोरोना बाधित मिळून आले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबत मृत्यूही वाढत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे.
7 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू -
नागपूरात जिल्ह्यात 1037 रुग्ण शहरातील विविध भागात आढळून आलेत. यामध्ये 236 रुग्ण ग्रामीण भागातील असून 3 बाहेरील जिल्ह्यातील रुग्ण आहेत. यात नागपूर शहरात 7 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यात ग्रामीण भागात 1 तर बाहेर जिल्ह्यातील तीघेजण आहेत. सोमवारच्या दिवसात कोरोना चाचण्याची संख्या जवळपास 4 हजाराने घटली असता रुग्णसंख्येत वाढ दैनंदिन सरासरीच्या घरातच आल्याने रुग्णसंख्या वाढीचा आलेख वरच्या दिशेने वाढत असल्याचे दिसून येत आहे.
1039 जणांनी केली कोरोनवर मात-
पूर्व विदर्भात नागपूर जिल्ह्यात 1276 बाधित असून 1039 जणांनी कोरोनावर मात केली आहे. भंडारा जिल्ह्यात 46 नवीन बाधित आढळले असून 44 बरे होऊन घरी गेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही 38 कोरोना बाधित आढळले आहेत. तर 45 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. गोंदियात 25 बाधित असून 11 जण कोरोना मुक्त झाले आहे. वर्ध्यात 159 नवे कोरोना बाधित असून 146 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात 17 बाधित असून 24 जण कोरोनातून बरे झाले आहे. पूर्व विदर्भात 1505 बाधित झाले असून जवळपास 1309 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
हेही वाचा- कोलकाता येथील इमारतीला भिषण आग; अग्निशमन दलाच्या जवानांसह 7 जणांचा मृत्यू