ETV Bharat / city

नागपूर एनसीआयमध्ये 100 खाटांचे कोविड रुग्णालय सुरू; देवेंद्र फडणवीसांना घेतला पुढाकार - COVID hospital in NCI Nagpur

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपुरात अधिकाधिक सुविधा निर्माण करण्यासाठी आपण सारेच प्रयत्न करीत आहोत. नितीन गडकरी यांनीसुध्दा ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे येत्या चार ते पाच दिवसात नागपुरातील स्थिती बऱ्यापैकी सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

COVID hospital
कोविड रुग्णालय
author img

By

Published : Apr 16, 2021, 3:35 AM IST

नागपूर - माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपुरात गुरुवारी १०० खाटांच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर येथे करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन केले. येत्या काही दिवसातच अधिकच्या आणखी 100 खाटा येथे उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपुरात अधिकाधिक सुविधा निर्माण करण्यासाठी आपण सारेच प्रयत्न करीत आहोत. नितीन गडकरी यांनीसुध्दा ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे येत्या चार ते पाच दिवसात नागपुरातील स्थिती बऱ्यापैकी सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी फडणवीस यांनी नागपूर महापालिकेतील स्थितीचासुध्दा आढावा घेतला. ५०० बेड आणखी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत आहे. ऑक्सीजनचा प्रश्न सुटताच शहरात १५०० बेड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

नागपूर एनसीआयमध्ये 100 खाटांचे कोविड रुग्णालय सुरू

हेही वाचा-पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूमुळे स्मशानभूमी यंत्रणांवर ताण

रेमडेसिवीर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील-

पुढे विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले की, बुधवारी केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या उत्पादनासाठी अतिरिक्त साईट्सला मंजुरी दिली आहे. आज कोविड संकटाचा आपण सामना करतो आहोत. पण त्यापेक्षा भीतीचे वातावरण अधिक आहे. त्यामुळे समुपदेशनाची प्रक्रिया हाती घेणे हीसुध्दा काळाची गरज आहे. गरज असेल त्यालाच रुग्णालयात दाखल करणे आणि आवश्यकता असेल तेव्हा, रेमडेसिवीरचा वापर यासाठी सुयोग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. काही सामाजिक संघटना आणि भाजपा वैद्यकीय आघाडीच्या मदतीने हे काम हाती घेतले जात आहे, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis Nitin Gadkari
देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आदी

हेही वाचा-कोरोना महामारीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा; मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

१०० पैकी २० बेड व्हेंटिलेटरचे-

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही सुविधा निर्माण केल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच आणखी विस्तार करण्याचा हितोपदेश केला. डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या एनसीआयमध्ये या सुविधेत 20 बेड हे व्हेंटिलेटरसह तर उर्वरित 80 हे ऑक्सिजन बेड असल्याचे ते म्हणाले आहेत.

हेही वाचा-कोविड सेंटर रिअ‌‌ॅलिटी चेक : मुलुंड कोविड सेंटरमध्ये 450 खाटा रिक्त

आरटीपीसीआर चाचणी सुविधा उपलब्ध

आरटी-पीसीआर चाचण्यांचे अहवाल लवकर येऊन विषाणूचा प्रसार थांबावा, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस हे सातत्याने करीत आहेत. आता एनसीआयमध्ये आरटी-पीसीआर चाचण्यांची सुविधा वाढविण्यात येणार आहे. तसेच सीटी स्कॅन सुविधासुध्दा कोविड रुग्णांसाठी नाममात्र दरात प्रारंभ करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.