मुंबई - आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray )यांनी 8 जुलैपासून निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे. यावेळी दहिसर येथे बोलताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आपल्या आमदार पदाचा राजीनामा द्यावा, आणि निवडणुकीला ( Election ) सामोरे जावे असे आव्हान केले होते. त्यांच्यावर विश्वास केला, त्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीकाही बंडखोर आमदारांवर आदित्य ठाकरे यांनी ( Aditya Thackeray criticism ) केली होती.
बंडखोर आमदारांना आदित्य ठाकरे धारेवर धरले - संपूर्ण राज्यभर आदित्य ठाकरे यांच्याकडून निष्ठा यात्रा काढली जाणार आहे. 8 जुलैला निष्ठा यात्रा' यात्रेला सुरुवात केली असून या यात्रेतून बंडखोर आमदारांना आदित्य ठाकरे धारेवर धरले आहे. काल ते दहिसर येथे आपल्या कार्यकर्त्यांची निष्ठा यात्रेच्या माध्यमातून संवाद साधत होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बंडखोर आमदारांपैकी ज्यांना परत यायचे आहे, त्यांच्यासाठी मातोश्रीचे दार नेहमीच उघडे असल्याचे संकेत दिले आहेत. शिंदे गटात काही आमदारांना आपल्या इच्छे विरोधात तिथे राहावे लागत आहे. त्यामुळे अशा आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे केव्हाही उघडे आहे, असे संकेत त्यांनी यावेळी दिले आहे. तसेच बंडखोर आमदार पळून गेले असले, तरी शिवसैनिक अध्याप कुठे गेलेला नाही. त्यामुळे पक्षाला आमदार गेल्यामुळे कोणताही परिणाम झाला नसल्याचेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
प्रतोद भरत गोगावलेचा सवाल - झालेली विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनं एकत्रित लढवली. महाराष्ट्राच्या जनतेने युतीला कौल दिला होता. मात्र, जनतेच्या भावनेशी कदर न करता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी संग केला गेला. यावेळी लोकभावना पायदळी तुडवली गेली. असा सवाल शिंदे गटातील आमदार आणि प्रतोद भरत गोगावले यांनी केला आहे. 9 जून ला प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे त्यांना हा सवाल विचारला आहे. खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आणि पुढे घेऊन चाललो आहोत. लोकभावनेचा विचार करून आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या येथील सरकार आपण केला असल्याचे वक्तव्यही भरत गोगावले यांनी यावेळी केले. तसेच आता तरी असंगाशी संग सोडा असा चिमटा त्यांनी काढला आहे.
शिवसेना सावध झाली - महाराष्ट्रातील शिवसेनेच्या 40 आणि काही अपक्षांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे आता शिवसेना सावध झाली आहे. राष्ट्रपती निवडणूक आणि पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेने लोकसभेतील आपला प्रतोद बदलला आहे. खासदार भावना गवळी यांनी लोकसभा शिवसेनेच्या प्रतोद पदावरुन हकालपट्टी करण्यात आली ( Bhavana Gawali Removed Loksabha Chip Whip ) आहे. यासंदर्भात शिवसेना संसदीय नेते संजय राऊत यांनी केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहलं आहे. गवळींच्या जागी खासदार राजन विचारे यांची प्रतोद पदी नियुक्ती करण्यात आली आहे.