मुंबई - हनुमान नगर येथील एका बारमध्ये ( Hanuman Nagar Bar Incident ) रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत बारचा कर्मचारी जखमी झाला असून पोलिसांनी दोघांना ( Two Arrest In Hanuman Nagar Bar Fighting ) अटक केली आहे.
नाचण्यावरून झाला वाद -
हनुमान नगर येथील एका बारमध्ये काही लोक नाचत धिंगणा घालत होते. त्यांना बार मॅनेजरने हटकले असता त्यांनी धारदार शस्त्रे आणि बॅट, हॉकीने कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. तसेच त्यांना शिवीगाळही केली. ही घटना सुमारे रात्री 10.30 च्या सुमारास घडली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तसेच दोघांना अटक केली. दरम्यान, पोलिसांनी बारमधील जखमी कर्मचाऱ्याला रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी या प्रकरणी प्रज्ञादीपक महाडिक (26) आणि योगेश भास्कर (29) अशा दोघांना अटक केली आहे.
हेही वाचा - MSRTC Strike : ठाकरे सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांविरुद्ध मेस्मा लावण्याच्या हालचाली, अनिल परब म्हणतात..