मुंबई - कोरोना संसर्ग रोकण्यासाठी देशभर संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या उपासमारीच्या काळात नागरिकांना आधार देण्याचे काम अभिगो अल्युमनी ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले. अभिगोने ४०० गरजूंना धान्यवाटप करुन कोरोनाशी लढण्यास बळ दिले.
गोरेगाव परिसरातील नागरिकांची संचारबंदीमुळे उपासमार होत असल्याची माहिती अभिगोच्या माजी विद्यार्थ्यांना मिळाली होती. अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची संघटना असेल्या ‘अभिगो अल्युमनी ट्रस्ट’च्या विद्यार्थ्यांनी या गरजूंना मदत करण्याचे ठरवले. त्यामुळे माजी विद्यार्थी परेश चव्हाण, स्वप्निल झेमसे, दीपक खोत, मकरंद परब, सचिन शिरोडकर तसेच शाळेचे शिक्षक यशवंत करंजकर यांनी ४०० गरजूंना धान्य वाटप केले. या विद्यार्थ्यांना केंद्रीय गृहसचिव दीपक सिन्हा यांनी मोलाचे सहकार्य केले.