मुंबई - बांद्रा-वरळी सी लिंकवरून एका व्यक्तीने पोल क्रमांक 54 जवळून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास घडली. ही घटना घडताच घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली होती. आत्महत्या करणाऱ्या पार्थ सोमानी (25) यांचा मृतदेह सापडला आहे.
पार्थ सोमाणी मुलुंड येथील रहिवासी आहेत. टॅक्सी ने सिलिंक वर आला असता अचानक टॅक्सी थांबवली. त्यानी टॅक्सीतून बाहेर येत समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. या शोध मोहिमेत कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरची मदत घेतली गेली.