ETV Bharat / city

मुंबई : अंगावर झाड कोसळून तरुणाचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद - मुंबई ताज्या बातम्या

मालाड परिसरात झाड कोसळून जखमी झालेल्या तरुणावर मृत्यू ओढवला आहे. मालाड पूर्वेला छेडा जनरल स्टोअर येथे एक वृक्षाची पडलेली फांदी दुचाकीवरून निघालेले राजकुमार जैयसवाल यांच्या डोक्यात पडली.

Young man dies after tree falls on him in mumbai
मुंबई : अंगावर झाड कोसळून तरुणाचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद
author img

By

Published : May 21, 2021, 7:44 PM IST

मुंबई - सोमवारी आलेल्या चक्रीवादळादरम्यान ठीकठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. विक्रोळीत एक महिला अंगावर झाड कोसळण्यापासून थोडक्यात बचवाल्याचा व्हिडिओ सर्वत्र वायरल झाला असतानाच, मुंबईच्या मालाड परिसरात झाड कोसळून जखमी झालेल्या तरुणावर मृत्यू ओढवला आहे. मालाड
पूर्वेला छेडा जनरल स्टोअर येथे एक वृक्षाची पडलेली फांदी दुचाकीवरून निघालेले राजकुमार जैयसवाल यांच्या डोक्यात पडली. या दुर्घटनेत जैयसवाल याच्या डोक्यावरील हेल्मेटचे दोन तुकडे होऊन डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही अंगावरील थरकाप उडवणारा आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद

सायन रुग्णालयात तब्बल १३ तास शस्त्रक्रिया -

अपघातात जखमी झालेल्या जैयसवाल यांच्यावर सायन रुग्णालयात तब्बल १३ तास शस्त्रक्रिया चालली. त्याची मृत्यूशी झुंज सुरू असताना बुधवारी जैयसवाल यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जैयसवाल हे किराना व्यवसायिक होते. त्याचे आई-वडिल हे अंध असून पत्नी आणि मुल ही उत्तरप्रदेशात वास्तव्यास असतात. राजकुमार यांच्यावर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असल्याने त्यांच्या निधनाने जैयसवाल कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. गरीब कुटुंबातील असलेल्या राजकुमार जैयसवाल यांच्या कुटुंबियांना शासनाने व पालिकेने आर्थिक मदत करावी, अशी स्थानिकांकडून मागणी होते आहे.

हेही वाचा - बार्ज पी-305 : दुर्घटनेला ओएनजीसी कंपनी जबाबदार; प्रकरणाची चौकशी होणार - मंत्री अस्लम शेख

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.