मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबई दौऱ्यावर आज येणार आहेत. उद्यापासून (२ डिसेंबर) आदित्यनाथ यांच्या दौऱ्याला सुरूवात होणार असून, या दौऱ्यात ते मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक आणि बाॅलिवूड सेलिब्रिटींना भेटणार आणि चर्चा करणार आहेत.
असा असेल योगी यांचा दिवसभराचा कार्यक्रम
मिळालेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ 1 डिसेंबर रोजी 7 वाजण्याच्या सुमारास मुंबईला येण्यासाठी उत्तर प्रदेशमधून रवाना होतील, रात्री आठच्या सुमारास ते मुंबईत पोहोचतील. त्यानंतर उद्या सकाळी (2 डिसेंबर) ते एका छोटेखानी कार्यक्रमात जातील. त्यानंतर ते मुंबई शेअर बाजाराला भेट देतील. यानंतर उद्योजक व गुंतवणूकदार यांची भेट घेतली व चर्चा करतील. तसेच राज्यातील भाजप नेत्यांचीदेखील ते भेट घेतील.
मुंबईतून उत्तरप्रदेशातल्या इतर शहरांचाही बॉण्डची होऊ शकते घोषणा
मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यापासून योगी आदित्यनाथ यांचा हा दुसरा मुंबई दौरा आहे. उद्या योगी आल्यांनातर एका छोटेखानी सोहळ्यात लखनऊ महापालिके(LMC)च्या पहिल्यावहिल्या बाँडचं अनावरण करतील. लखनऊ महापालिकेने शहराचं सौंदर्यीकरण, विकास आणि स्वच्छता इ. कामांना गती देण्यासाठी २०० कोटी रुपयांचा बाँड जारी केला आहे. या बाँडला गुंतवणूकदारांची जबरदस्त प्रतिसाद दिल्याने हा बाँड ४.५ पट अधिक (४५० कोटी रुपये) सब्स्क्राईब झाला आहे. यामुळे आता उत्तर प्रदेश सरकार गाजिायाबाद, वाराणसी, आगरा आणि कानपूर इ. शहरांसाठी देखील बाँड काढण्याची घोषणा उद्या योगी करू शकतात.
मुंबईतुन उत्तरप्रदेशात उद्योजकांना गुंतवणूक करण्याचे आवाहन
आपल्या दुसऱ्या मुंबई दौऱ्यात योगी आदित्यनाथ उद्योजक-बँकर्स आणि बाॅलिवूड सेलिब्रिटींसोबत चर्चा करून उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचं आवाहन करतील. बुधवारी योगी आदित्यनाथ यांची टाटा सन्सचे एन.चंद्रशेखर, हिरानंदानी ग्रुपचे डाॅ.निरंजन हिरानंदानी, भारत फोर्जचे बाबा कल्याणी, सीमोन्सचे सीईओ सुप्रकाश चौधरी, एल. अॅण्ड टी चे चेअरमन एस.एन. सुब्रमण्यम, कॅपिटल सर्विसचे विकास जैन, केकेआरचे चेअरमन संजय नायर, सेंट्रम कॅपिटल लि.चे चेअरमन जसपाल बिंद्रा, टाटा अॅडव्हांस सिस्टिमचे सीईओ आणि एमडी सुकरण सिंग, टाटा डिफेन्स टेक्नाॅलाॅजीचे हर्षवर्धन, अदानी डिफेन्सचे आशिष राजवंश, अशोक लेलँडचे रजत गुप्ता, टेलिकाॅम डिफेन्स सिस्टिमचे सीईओ टी.एस.दरबारी इ. उद्योजकांना भेटतील. सोबतच मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा यांचीही ते भेट घेतील अशी माहिती मिळत आहे.
हेही वाचा : मोदींचा वाराणसी दौरा; कृषी कायद्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न