मुंबई - एनआरसी आणि सीएए कायद्याला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी(दि. 29 जानेवारी) भारतीय मुक्ती मोर्चाने या कायद्याला विरोध म्हणून बंदची हाक दिली होती. या बंदला काही मुस्लीम संघटनांनी देखील प्रतिसाद दिला.
मुंबईत बंदचा फारसा परिणाम दिसत नसला तरी मुस्लीम बहुल भेंडी बाजार, नळ बाजार, मनीष मार्केट, भायखळा या भागात कडकडीत बंद दिसून आला. मुंबईत व्यवहार सुररळीतपणे सुरू आहेत. सकाळी भारतीय मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर रुळावर उतरुन लोकल रेल्वे अडवली होती. त्यावेळी आंदोलकांनी मुंबईकडे जाणारी लोकल रोखून धरली होती. या आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रुळावरुन हटवले होते. त्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली होती.
हेही वाचा - राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयांच्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट
आम्ही भारत बंदचा आवाज दिला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई सेंट्रल याठिकाणी पूर्णपणे बंद होते. लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. हा कायदा मुस्लीम विरोधी आहे, असे चित्र उभे केले जात आहे. मात्र, याचा परिणाम भटके विमुक्त जाती, शीख यांच्यावर सुद्धा होणार आहे, असे भारतीय मुक्ती मोर्चाचे मधुकर जाधव यांनी सांगितले.
हेही वाचा - वाचनाची गोडी लागण्यासाठी 'एसएनडीटी'त ग्रंथोत्सव