ETV Bharat / city

Shinde vs Thackeray होय मी विकासाचे कंत्राट घेतलंय, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार पलटवार

असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री कधीही बरा, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर जोरदार पलटवार केला. Shinde vs Thackeray राज्यात वैचारिक दिवाळखोरीतून विरोधक टीका करत आहेत असा घणाघातरी शिंदे यांनी यावेळी केला.

Shinde vs Thackeray
Shinde vs Thackeray
author img

By

Published : Aug 25, 2022, 8:21 PM IST

मुंबई - सर्व घटनात्मक तरतूदी, सोपस्कार पार पाडून, बहुमत सिद्ध करुन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात ठाकरे यांच्या टिकेचा चांगलाच समाचार घेतला. Chief Minister Eknath Shinde उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भरल्या ताटावरुन अटक करण्यात आली होती. याची आठवणही शिंदे यांनी करुन दिली. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलले म्हणून ही अटक करण्यात आल्याची टीकाही शिंदे यांनी केली आहे.

होय मी कंत्राटी मुख्यमंत्री घटनात्मक तरतुदी पूर्ण करुनही मुख्यमंत्री हे कंत्राटी वाटत असेल तर होय आपण कंत्राटी मुख्यमंत्री आहे, असे त्यांनी सांगितले. राज्यातील जनतेच्या विकासाचे कंत्राट आपण घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. Chief Minister Shinde attack on Uddhav Thackeray तसेच, बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचेही आपण कंत्राट घेतले आहे अस सांगायलाही ते विसरले नाहीत. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचे कंत्राट, सर्वसामानम्य जनतेला न्याय देण्याचं आणि आश्रू पुसण्याचे, लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचे कंत्राट आपण घेतले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे. सध्या वैचारिक दिवाळखोरीतून हिणवणे सुरु आहे. CM Shinde's strong attack on Thackeray मात्र, आम्ही कामाने उत्तर देऊ असही एकनाथ शिंदे यांनी म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे राज्यात वीज कंत्राटी कामगारांचा प्रश्न गंभीर झालेला असल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले होते. कंत्राटी कामगारांप्रमाणेच मुख्यमंत्री हेही कंत्राटी आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्या पदावर किती काळ आहेत हे त्यांनाच माहित नसल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. त्याचबरोबर भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे की चोरबाजार आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली होती.

हेही वाचा - CAG Report अजित पवार यांच्या कोरोना काळाती कामाचे कॅगच्या अहवालामध्ये कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.