ETV Bharat / city

Yashwant Jadhav In BMC : आयकर विभागाच्या छाप्यानंतर यशवंत जाधव पुन्हा पालिकेच्या कामात सक्रिय

author img

By

Published : Feb 28, 2022, 10:19 PM IST

शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव ( Yashwant Jadhav ) , त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्या घरावर शुक्रवारी पहाटे आयकर विभागाने ( IT Raid On Yashwant Jadhav House ) छापा टाकला. हा छापा तब्बल ७२ तास सुरु होती. ही धाड सकाळी संपल्यावर आज सोमवारी दुपारी यशवंत जाधव हे ( Yashwant Jadhav In BMC ) पालिका मुख्यालयात येऊन पुन्हा पालिकेच्या कामात सक्रिय झाले आहेत.

Yashwant Jadhav Latest News
Yashwant Jadhav Latest News

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव ( Yashwant Jadhav ) , त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्या घरावर शुक्रवारी पहाटे आयकर विभागाने ( IT Raid On Yashwant Jadhav House ) छापा टाकला. हा छापा तब्बल ७२ तास सुरु होती. ही धाड सकाळी संपल्यावर आज सोमवारी दुपारी यशवंत जाधव हे ( Yashwant Jadhav In BMC ) पालिका मुख्यालयात येऊन पुन्हा पालिकेच्या कामात सक्रिय झाले आहेत. अर्थसंकल्प पालिका सभागृहकडे पाठवत त्यांनाही मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. दरम्यान आयकर विभागाच्या धाडीबाबत जाधव यांनी नकार दिला.

आयकर विभागाची धाड -

शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव व भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांच्या माझगाव येथील घरी आयकर विभागाने धाड टाकली. यामिनी जाधव यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत आमदार होताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याने निवडणूक विभागाने आयकर विभागाला चौकशी करण्यास सांगितले होते. त्याच सोबत यशवंत जाधव यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमैया यांनी मनी लॉंडरिंगचा आरोप केला आहे. सोमैया यांनी जाधव यांच्यावर याआधी १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. जाधव यांनी १५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करत ही रक्कम त्यांनी यूएईला हलवल्याचा आरोपही सोमैया यांनी केला आहे. या अनुषंगाने आयकर विभागाने धाड टाकल्याचे समजते.

जाधव पुन्हा पालिका कामात व्यस्त -

शुक्रवारी सकाळी सहा वाजता सुरु झालेली धाड आज सोमवारी चौथ्या दिवशी संपली. तब्बल ७२ तास आयकर अधिकारी यशवंत जाधव यांच्या घरी ठाण मांडून बसले होते. या धाडी दरम्यान आमदार यामिनी जाधव यांची प्रकृती बिघडली होती. अशा परिस्थीत आपल्याला व आपल्या कटूंबाला सावरले. आज सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी जाधव यांच्या घरातून बाहेर पडले. त्यानंतर दुपारी यशवंत जाधव पालिकेतील आपल्या दालनात हजर झाले. पालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केलेला ४५ हजार कोटींचा अर्थसंकल्प पालिकैचा कार्यकाळ संपण्यापूर्वी मंजूर करणे अपेक्षित असल्याने तो सभागृहाकडे मंजुरीसाठी पाठवला. त्यानंतर मराठा भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम पालिका सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमालाही जाधव यांनी उपस्थीती लावली.

हेही वाचा - समाजाच्या हितासाठी उपोषणाचा निर्णय महत्त्वाचा; संभाजीराजेंच्या पत्नीसोबत 'ईटीव्ही'ने केली बातचीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.