ETV Bharat / city

दिलीप कुमार यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. दिलीप कुमार यांचे बुधवारी सकाळी निधन झाले, त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

author img

By

Published : Jul 8, 2021, 7:36 AM IST

दिलीप कुमार
दिलीप कुमार

मुंबई - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं असून ते 98 वर्षांचे होते. बुधवारी सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर सांताक्रूझ येथील दफनभूमी येथे अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. दिलीप कुमार यांना शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. दिलीप कुमार यांचे नाव फक्त देशात नाही. तर बाहेरील देशात देखील प्रसिद्ध होते. यामुळे त्यांच्या जाण्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

बॉलिवूड सुपरस्टार दिलीप कुमार यांचे बुधवारी सकाळी निधन झाले, त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. शेवटची झलक पाहण्यासाठी शेकडोंची गर्दी जमली होती. दिलीपकुमार यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळलेले होते. यावेळी त्यांची पत्नी सायरा बानू देखील या ठिकाणी उपस्थित होत्या. दफनभूमीच्या आधी त्यांना मशिदीत नेण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव सांताक्रूझ स्मशानभूमीत नेण्यात आले. जेथे शासकीय सन्मान देऊन त्यांना अंतिम निरोप देण्यात आला.

बॉलिवूड कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली -

अभिनेता शाहरुख खान, करण जोहर, रणबीर कपूर, जॉनी लीव्हर यांनी शोक व्यक्त केला. शाहरुख खानचे दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्याशी खास नाते आहे. शाहरुखला ही बातमी समजताच तो त्वरित त्यांच्या घरी पोहोचला होता. सायरा बानो यांचे सांत्वन करताना तो पाहायला मिळाला. तर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी दफनभूमी येथे दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.