ETV Bharat / city

Mumbai Theft Incident : लॉकडाऊन काळात मुंबईत 84 कोटी 77 लाखांच्या मुद्देमालची चोरी - मुंबई लॉकडाऊन काळात चोरी

मुंबई शहरामध्ये मागील चार वर्षात झालेल्या चोऱ्यांच्या वेगवेगळ्या ( Theft Incident In Mumbai ) घटनेमध्ये 460 कोटी 48 लाख रुपयाचे मुद्देमाल चोरी गेला आहे. 163 कोटी 24 लाख रुपयांचा मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे. अद्यापही 303 कोटी 79 लाख रुपयाचा मुद्देमाल परत पोलिसांना अद्याप परत मिळवता आलेला नाही.

Mumbai Theft Incident
Mumbai Theft Incident
author img

By

Published : May 8, 2022, 8:02 PM IST

मुंबई - मुंबई शहरामध्ये मागील चार वर्षात झालेल्या चोऱ्यांच्या वेगवेगळ्या ( Theft Incident In Mumbai ) घटनेमध्ये 460 कोटी 48 लाख रुपयाचे मुद्देमाल चोरी गेला आहे. 163 कोटी 24 लाख रुपयांचा मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे. अद्यापही 303 कोटी 79 लाख रुपयाचा मुद्देमाल परत पोलिसांना अद्याप परत मिळवता आलेला नाही. मुंबई कोरोना काळामध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मुंबईत 84 कोटी 77 लाख रुपयाचे चोऱ्या झाले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

मुंबई शहरामध्ये वाढती गुन्हेगारी आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती विकट होत चालली असल्याची भेटी चर्चा सुरू आहे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. 2018 ते 2021 या चार वर्षांत चोरीला गेलेला तब्बल 303 कोटी 79 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना अद्याप परत मिळवता आलेला नाही. चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळवण्याचं या चार वर्षांचं सरासरी प्रमाण केवळ 35 टक्के एवढंच आहे. छोट्या मोठ्या चोऱ्या, गळ्यातल्या सोनसाखळ्यांची चोरी, घरफोडी, दरोडे, लूटमार आणि वाहनांची चोरी अशा विविध प्रकारे झालेल्या चोऱ्यांच्या आकडेवारीचा यात समावेश आहे. 2018 ते 2021 या कालावधीत अनुक्रमे 129.33 कोटी, 124.48 कोटी, 84.37 कोटी आणि 122.3 कोटी रुपये मूल्याच्या मुद्देमालाची चोरी झाली. या चार वर्षांत अनुक्रमे 40.47 कोटी, 41.85 कोटी, 27.77 कोटी आणि 53.15 कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना परत मिळवता आला आहे.

लॉकडाऊनमध्ये सर्वात कमी मुद्देमाल परत - अशा प्रकारच्या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी आणि मुद्देमाल परत मिळवण्यासाठी मुंबई शहर पोलिसांनी सर्व पोलीस स्टेशन्समध्ये स्वतंत्र तपास पथकं नेमली आहेत. त्यात दोन ऑफिसर्स आणि काही काँस्टेबल्सचा समावेश आहे. या टीम्स दोन शिफ्ट्समध्ये काम करतात. गुन्हे शाखेचे पोलीस इन्स्पेक्टर या टीम्सचं नेतृत्व करत असतात. मुद्देमाल परत मिळण्याचं प्रमाण जास्त असण्यासाठी गुन्हेगाराचा शोध लवकर लागणं सर्वांत महत्त्वाचं असतं पण या डिटेक्शन टीम्सना एकावेळी सरासरी 50 गुन्ह्यांची प्रकरणं हाताळावी लागतात. काही पोलीस स्टेशन्समध्ये तर हे प्रमाण 100 गुन्ह्यांवरही जातं. त्यामुळे खूप मोठा कामाचा ताण पोलीस अधिकाऱ्यांवर पडत असतो, असे देखील एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन असतानासुद्धा मुंबईमध्ये वेगवेगळ्या चोरींमधून 84 कोटी 37 लाख रुपयाच्या चोऱ्या झाल्या असल्याची माहिती समोर आली असून त्यामध्ये मुंबई पोलिसांना 27 कोटी 77 लाख रुपये मुद्देमाल परत आणण्यात यश मिळाले आहे. 2018 आणि 2019 च्या तुलनेत चोरीला गेलेल्या मुद्देमालचे प्रमाण कमी आहे. तसेच 2018 च्या तुलनेत 2020 मध्ये मुद्देमाल परत आणण्याचे प्रमाण दोन टक्क्याने जास्ती आहे.

चोरी गेलेला मुद्देमाल -

  • 2018 129.33 कोटी 40.47 कोटी
  • 2019 124.48 कोटी 41.85 कोटी
  • 2020 84.37 कोटी 27.77 कोटी
  • 2021 122.3 कोटी 53.15 कोटी

हेही वाचा - Navneet Rana challenges CM : 'मुख्यमंत्र्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी', नवनीत राणांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.