ETV Bharat / city

पुष्पक एक्सप्रेस सामूहिक बलात्कार प्रकरण; 5 जणांना अटक, तिघांचा शोध सुरू - कल्याण लोहमार्ग पोलीस

धक्कादायक बाब म्हणजे दरोडेखोरांनी २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांसह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला.

पुष्पक एक्सप्रेस सामूहिक बलात्कार प्रकरण

author img

By

Published : Oct 10, 2021, 1:48 AM IST

मुंबई- पुष्पक एक्सप्रेसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. इतर तिघांचा शोध घेतला जात असल्याची माहिती मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिली आहे.

खनौहुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या धावत्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना इगतपुरी ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान घडली. सात ते आठ दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमध्ये अचानक प्रवेश केला. त्यांनी १० ते २० प्रवाशांना धाक दाखवून रोकड, मोबाईल आणि दागिने लुटल्याचा प्रकार घडला.

हेही वाचा-बस - ट्रेनमधील बलात्काराच्या 'या' घटनांनी हादरले होते महाराष्ट्र, वाचा सविस्तर...

दोघे अटकेत -

धक्कादायक बाब म्हणजे या दरोडेखोरांनी २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांसह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला. प्रकाश पारधी व अर्षद शेख असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. हे आठ आरोपी एकमेकांचे मित्र असून यामधील सात जण घोटीमध्ये राहतात तर एक जण मुंबई येथे राहण्यास आहे.

हेही वाचा-इम्तियाज खत्रीला पुन्हा सोमवारी हजर होण्याचे एनसीबीचे समन्स; तर आणखी एका ड्रग पेडलरला अटक

नशेच्या आहारी जाऊन त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसाची पथके फरार आरोपींचा शोध घेत आहेत. महिलेची तब्येत स्थिर आहे.

प्रवाशांना मारहाण -

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून ट्रेन मुंबईच्या दिशेने येत असताना इगतपुरी स्थानक सोडल्यानंतर ट्रेन बोगद्याजवळ पोचली. त्यावेळी ट्रेन स्लो असल्याने रात्री आठच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनतर प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. दरोडेखोरांचा हातात फाइटर आणि बेल्ट होता. धक्कादायक बाब म्हणजे एका २० वर्षीय प्रवाशी तरुणीसोबत दरोडेखोरांनी छेडछाड करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मात्र या दरम्यान काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले. कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे.

हेही वाचा-नागपूरकरांनो सावधान! तुमच्यावर पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची आहे नजर...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.