ETV Bharat / city

Mumbai Crime : रजनीकांत सोबत काम देण्याच्या बहाण्याने दहिसरमधील मुलीला 10 लाखांना घातला गंडा - Girl in Dahisar was cheated of 10 lakhs

दहिसर परिसरात राहणाऱ्या 21 वर्षे मुलीची फिल्म इंडस्ट्रीत अभिनेता रजनीकांत ( Actor Rajinikanth ) यांच्या सोबत काम करण्याची संधी देतो अशी बतावणी करून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ( Girl in Dahisar was cheated of 10 lakhs )

Mumbai Crime
10 लाखांना घातला गंडा
author img

By

Published : Oct 1, 2022, 6:39 PM IST

मुंबई : दहिसर परिसरात राहणाऱ्या 21 वर्षे मुलीची फिल्म इंडस्ट्रीत अभिनेता रजनीकांत ( Actor Rajinikanth ) यांच्या सोबत काम करण्याची संधी देतो अशी बतावणी करून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दहिसर पोलीस ठाण्यात ( Dahisar Police Station ) तक्रार दाखल केली आहे. ( Girl in Dahisar was cheated of 10 lakhs )

दहा लाखांचा गंडा : पीडित 21 वर्षे मुलीची सुपरस्टार रजनीकांत सोबत काम करण्याची संधी देतो असे सांगून दहा लाखांचा गंडा घालण्यात आला. त्यानंतर मुलीने दहिसर पोलीस ठाण्यात आरोपी पियू जैन आणि मंथन रूपारेल या दोघांवर आयपीसी कलम 419, 420, 465, 68, 471, 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीला हैदराबादच्या वेंकटेश्वरा क्रिएशनने दोन सिनेमांची ऑफर दिली होती. आरसी 15 आणि जेलर असे दोन सिनेमा बनवत असून या दोन्ही सिनेमांमध्ये सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत काम करण्याची निवड झाल्याची बतावणी या मुली सोबत करण्यात आले.या चित्रपटातील भूमिकांसाठी पासपोर्ट फॉरेक्स कार्ड गव्हर्मेंट कडून मिळणाऱ्या परमिशन या सर्वांच्या नावाखाली आरोपींनी तरुणीकडून दहा लाख 31 हजार 636 रुपये उकळले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.