मुंबई - महाविकास आघाडीला डच्चू देत एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यासह शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या सत्तांतराच्या चर्चा महाराष्ट्राबरोबरच देशभरामध्ये आजही सुरु आहेत. विशेष सत्तांतर नाट्या मध्ये गुवाहाटीचा दौरा हा बंडखोर आमदारांसाठी कायमचा चर्चेचा विषय राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं लहान मुलांवर भरपूर प्रेम आहे. विशेष करून त्यांचं त्यांच्या नातवावरील प्रेम सुद्धा लपून राहिलेला नाही. अशातच त्यांचा एका छोट्या मुलीसोबतचा एक व्हिडीओ सध्या (Chief Minister Shinde viral video ) व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकलीने मुख्यमंत्री शिंदेंकडे थेट गुवाहाटीला घेऊन जाण्याचीच मागणी ( Demand to be taken to Guwahati ) केली आहे.
मला पण मुख्यमंत्री होता येईल का? त्यांच असं झालं की, रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवणच्या विठ्ठलराव जोशी चॅरिटीज आणि ट्रस्ट इंग्लिस मिडीयम स्कूल इथं शिकणाऱ्या अन्नदा डामरे या चिमुकलीने शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या ( Met Annada Damre Shinde ) बंगल्यावर भेट घेतली. यावेळी अन्नदाने मुख्यमंत्री शिंदेंना विचारलं, “तुम्ही पाण्यात जाऊन पूरग्रस्तांना मदत केली. मी पण पूरग्रस्तांना पाण्यात जाऊन मदत केली तर मला पण मुख्यमंत्री होता येईल का?” यावर मुख्यमंत्री शिंदेंनी या चिमुकलीच्या खांद्यावर हात ठेवत, “हो, होशील की” असं उत्तर दिलं.
तुम्ही आता रुद्रांशला वेळ कसा देणार? त्यानंतर अन्नदा पुन्हा म्हणाली की, “पूर्वी मला फक्त मोदीजी आवडायचे. पण धर्मवीर बघितल्यापासून तुम्ही पण आवडू लागले. पण आता तुम्ही आता रुद्रांशला वेळ कसा देणार?” असा प्रश्न तिने विचारला. त्यावर “मी त्याला भेटायला ठाण्याला जाणार होतो. पण तोच मला भेटायला इकडे आला,” असं उत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं. शेवटी जाता जाता अन्नदाने मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा एक प्रॉमिसही मागितलं. “येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही आम्हाला गुवाहाटीला फिरायला घेऊन जाणार का?,” असा प्रश्न या चिमुकलीने विचारला. पण हा प्रश्न ऐकताच सर्व उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तर एकनाथ शिंदेंनाही काय बोलावं हेच कळेना. यावर फक्त हसत होकारार्थी मान डोलवली. “कामाख्या मंदिरामध्ये देवीचं दर्शन करायचं ना?” असं मुख्यमंत्री शिंदेंनी विचारलं असताना अन्नदाने होकारार्थी मान डोलवली. शेवटी “फार हुशार आहे,” असं म्हणत तिचा गाल ओढून मुख्यमंत्री शिंदें निघून गेले.