मुंबई - सीबीआय विशेष कोर्टाचे न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तसे संकेत दिले आहेत. मुंबईतील पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा... अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी पंतप्रधानांचे अर्थसंकल्पावर वैयक्तिक लक्ष
न्या. लोया यांचा २०१४ मध्ये नागपूरमध्ये मृत्यू झाला होता. मात्र, हा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा काही जणांनी केला होता. या प्रकरणावरून मोठ्या चर्चाही झडल्या होत्या. निवृत्त न्यायमूर्ती सावंत, काँग्रेसचे खासदार कुमार केतकर हे मंत्र्यांना भेटून या संदर्भात माहिती देणार आहेत. त्यांनी माहिती दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर आवश्यकता वाटल्यास चौकशीचे आदेश दिले जातील, असे अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हेही वाचा... आम्हाला विरोधी पक्षाची काळजी वाटते, 'सामना'तून भाजपला टोला
न्या. लोया यांच्या मृत्यूबाबत कोणी ठोस पुराव्यासह तक्रार दाखल केली. तर, या प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू करण्यात येईल, असे यापूर्वी सरकारमधील सूत्रांनी स्पष्ट केले होते. मात्र आता न्या. लोयाप्रकरणी आपण तक्रारदारांशी चर्चा करुन पुढची चौकशी करु. तसेच पी. बी. सावंत आणि कुमार केतकर यांचीही आपण भेट घेणार आहे, असे गृहमंत्री देशमुख म्हणाले.
हेही वाचा... ओबीसी जनगणना ठराव; अध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधार्यांचा विरोध फेटाळून केला मंजूर
कोरेगाव-भीमा प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा करुन, त्यावर नंतर बोलेन. असेही गृहमंत्री देशमुख यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. तसेच फ्री काश्मील फलका प्रकरणी बोलताना, महेक मिर्जा मुलीने फ्री कश्मीर फलक फडकवल्याबद्दल तिने आपली भुमिका सांगितली आहे. या मुलीने कश्मीर नागरीकांना पाठींबा देण्यासाठी फलक मांडला होता. पडलेला फलक उचलून दाखवला असेल, तर फ्री कश्मीर फलक कोणी बनवला याची चौकशी करू असेही गृहमंत्री म्हणाले.