ETV Bharat / city

चौकशीसाठी ईडीला पूर्ण सहकार्य करणार - एकनाथ खडसे

भोसरी एमआयडीसी परिसरामध्ये जमीन व्यवहार संदर्भात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीकडून चौकशीचे समन्स पाठवण्यात आले होते. याप्रकरणी एकनाथ खडसे यांची शुक्रवारी तब्बल 7 तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे
author img

By

Published : Jan 15, 2021, 6:22 PM IST

Updated : Jan 15, 2021, 9:33 PM IST

मुंबई - पुण्यातील भोसरी एमआयडीसी परिसरामध्ये जमीन व्यवहार संदर्भात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीकडून चौकशीचे समन्स पाठवण्यात आले होते. याप्रकरणी एकनाथ खडसे यांची शुक्रवारी तब्बल 7 तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी दिली असून, त्यांना हवी असलेली सर्व कागदपत्रे मी दिली आहेत. याबरोबरच ईडीच्या अधिकाऱयांना या संदर्भात जी जी कागदपत्रे हवी असतील ती मी देईन व चौकशीत पूर्ण सहकार्य करेल, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसे - ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी

काय आहे प्रकरण

तत्कालीन भाजप सरकारमध्ये महसूल मंत्री पदावर असलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर पत्नी व जावयाकडून पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसी परिसरातील जमीन व्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यावर हे आरोप केले होते. मात्र, हा व्यवहार पूर्णपणे खासगी जमिनीचा झालेला असून कायद्याच्या चौकटीत राहूनच पत्नी व जावयाकडून ही जमीन विकत घेतली गेल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केलेला होता. या अगोदर या संदर्भात 3 तपास यंत्रणांकडून एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देण्यात आलेली असून, आपण कुठलीही चुकीची गोष्ट केली नसल्याचे एकनाथ खडसे हे वारंवार सांगत आले आहेत.

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आणि ईडी नोटीस

तुम्ही माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असताना एकनाथ खडसे यांनी विरोधकांना दिला होता. पण ईडीची नोटीस आल्यावर एकनाथ खडसे यांनी जरा नरमाईची भूमिका घेतली. आज ते ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात हजर झाले. यावेळी त्यांची मुलगी त्यांच्यासोबत होती. ईडीने दिवसभर त्यांची चौकशी केली. त्यानंतर सायंकाळी ते ईडीच्या ऑफिसबाहेर आले. या प्रकरणांमध्ये अंजली दमानिया यांनी सुरुवातीपासूनच एकनाथ खडसे यांच्या विरोधात गैरव्यवहारप्रकरणी आरोप केले आहेत.

प्रतिनिधी महेश बागल यांनी घेतलेला आढावा

अंजली दमानिया यांच्याकडून ईडीला कागदपत्रे सादर

भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना ईडीकडून चौकशीचे समन्स पाठवण्यात आले होते. याप्रकरणी एकनाथ खडसे यांची चौकशी केली जात असताना या संदर्भातील मुख्य तक्रार असलेल्या सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्या वकिलांकडे ईडीने काही कागदपत्रांची मागणी केली होती. त्यानुसार दमानियांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना घोटाळ्यासंदर्भातील कागदपत्रे दिली आहेत. या प्रकरणांमध्ये अंजली दमानिया यांनी सुरुवातीपासूनच एकनाथ खडसे यांच्या विरोधात गैरव्यवहारप्रकरणी आरोप केलेले आहेत.

एकनाथ खडसेंना झाली होती पुन्हा कोरोनाची लागण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजीमंत्री एकनाथ खडसे यांना काही दिवसांपूर्वी पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली. काही दिवसांपूर्वी सर्दी, खोकला, ताप अशी कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने त्यांनी आपली कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल नुकताच पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले जात होते. खडसेंना कोरोनाची लागण झाल्याबाबत जळगाव जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी दुजोरा दिला होता. यापूर्वीही मागील महिन्यात खडसे कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. त्यामुळे खडसे यांना ईडीप्रमाणेच कोरोनानेही बेजार केले आहे.

Last Updated : Jan 15, 2021, 9:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.